अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » अनिल परबांकडून गद्दार उल्लेख, शंभुराज देसाई संतापले म्हणाले, बाहेर ये तुला दाखवतो; विधान परिषदेत जोरदार खडाजंगी

अनिल परबांकडून गद्दार उल्लेख, शंभुराज देसाई संतापले म्हणाले, बाहेर ये तुला दाखवतो; विधान परिषदेत जोरदार खडाजंगी

अनिल परबांकडून गद्दार उल्लेख, शंभुराज देसाई संतापले म्हणाले, बाहेर ये तुला दाखवतो; विधान परिषदेत जोरदार खडाजंगी

मुंबई- विधानपरिषदेत आज वातावरण चांगलेच तापले. विरोधी बाकांवरील ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि महायुतीचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या जोरदार हमरीतुमरी झाली. मराठी माणसाच्या मुद्यावर बोलताना ही खडाजंगी झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या तुफानी शाब्दिक वादामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सभागृहातील वातावरण तापल्यानंतर अखेर सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुंबई आणि महानगर भागात आता मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास सुरू आहे. यामध्ये उभ्या राहणाऱ्या इमारतींमधील 40 टक्के घरे मराठी माणसांसाठी राखीव ठेवण्याची मागणी परब यांनी केली. सरकारने आता याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. महायुती सरकारकडून शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना ठाकरे गटाला लक्ष्य केले. 

तुम्ही मराठी माणसासाठी काही केलं नाही असा आरोप त्यांनी केला. तुमचं मराठी आणि मराठी माणसावरील प्रेम हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. त्यावर परब हे संतापले आणि देसाई यांना प्रत्युत्तर देत सरकार काय करणार हे सांगा असे म्हटले. मात्र, शंभूराज देसाई यांनी परब यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू ठेवला. या दोन्ही नेत्यांमध्ये शा‍ब्दिक चकमक सुरू असल्याने सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले. अखेर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket