शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन तडीपार इसमाच्या मुसक्या आवळल्या; 3 गावठी पिस्टलसह 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त
Home » राज्य » प्रशासकीय » सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे– खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे– खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे– खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक संपन्न

सातारा, दि. १८ : जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने एकत्र काम करावे, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण(दिशा) समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ प्रिया शिंदे, विधान परिषदेचे आमदार धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध यांच्यासह समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

खासदार श्री. भोसले म्हणाले, “दिशा समितीच्या सदस्यांनी केंद्र शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीविषयी लेखी म्हणणे मांडावे. अधिकाऱ्यांनी शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांना महत्त्व देऊन काम करावे. मुलांना संगणक शिक्षण देणे खूप महत्त्वाचे आहे, यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना संगणक हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये चांगली स्वच्छता ठेवावी. प्रत्येक रुग्णालयाला स्त्री प्रसुतीचे जे उद्दिष्ट दिले आहे ते पूर्ण करावे, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही मुख्यालय सोडू नये.

जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. या खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर फंडाचा वापर करावा. हा फंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी दिशा समितीच्या सदस्यांबरोबर अधिकाऱ्यांनीही प्रयत्न करावेत. केंद्र शासनाच्या ज्या योजना शेतकऱ्यांशी संबंधित आहेत, त्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिला पाहिजे. ज्या योजनांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावयाचा आहे, त्याबाबत लेखी माहिती द्यावी त्याचाही योग्य पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही खासदार श्री. भोसले यांनी या बैठकीत दिली.

या बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जिल्ह्यातील कामे, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन आणि महावितरण यांच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण

शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket