अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » रांची-दिल्ली एअर अ‍ॅम्ब्युलन्समधील सर्व ७ जणांचा मृत्यू; सोमवारी रात्री झाला होता अपघात!

रांची-दिल्ली एअर अ‍ॅम्ब्युलन्समधील सर्व ७ जणांचा मृत्यू; सोमवारी रात्री झाला होता अपघात! 

रांची-दिल्ली एअर अ‍ॅम्ब्युलन्समधील सर्व ७ जणांचा मृत्यू; सोमवारी रात्री झाला होता अपघात! 

झारखंडमध्ये एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या झालेल्या अपघातात विमानातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती चतरा जिल्ह्याचे पोलिस उपायुक्तांनी पीटीआयला दिली आहे. सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरियाजवळ रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सला अपघात झाला. रांची येथून उड्डाण घेतल्यानंतर काहीकाळ हे चार्टर विमान रडारवरुन गायब झाले होते. दरम्यान, काही वेळानंतर त्याचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले.

रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सने सोमवारी संध्याकाळी ७.११ वाजता रांची विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर हे विमान रडार दिसत नसल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, काही वेळानंतर या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला एक व्यक्ती दगावला असल्याचे सांगितले जात होते दरम्यान, आता सर्व सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

चतरा उपायुक्त कीर्तीश्री यांनी पीटीआयला अपघाताबाबत माहिती दिली. ‘एअर अ‍ॅम्ब्युलन्समधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला आहे. रांचीहून दिल्लीला जात असताना विमान संध्याकाळी ७.३० च्या सुमारास बेपत्ता झाले होते. सिमरियाच्या बरियातु पंचायत परिसरात ते कोसळले,’ अशी माहिती कीर्तीश्री यांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket