अक्षय शिंदेचा एन्काऊंटर! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडल्या गोळ्या
आधी पोलिसांवर गोळीबार अन् नंतर अक्षय शिंदेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पोलीस व्हॅनमध्ये असताना आरोपी अक्षय शिंदे याने शेजारीच बसलेल्या पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून थेट त्यांच्यावरच गोळीबार केला. ज्यानंतर इतर पोलिसांनी स्व-संरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला आज (23 सप्टेंबर) दुसऱ्या गुन्ह्याप्रकरणी तळोजावरून ठाण्यात आणण्यात येत होतं. त्याचवेळी मुंब्रा बायपासजवळ अचानक अक्षय शिंदेने पोलिसाची बंदूक खेचली आणि पोलिसांवर गोळ्या झाडल्या ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला. ज्यानंतर पोलिसांनी स्व-संरक्षणार्थ गोळीबार केला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
