अक्षय बोराटे यांना अंत्यत प्रतिष्ठेचा समजला जाणारा भारत बिजनेस अवॉर्ड २०२४ देऊन गौरविण्यात आले
बावधन प्रतिनिधी सातारा पुणे येथील शेतकरी वर्गाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असलेल्या निर्मिक कॉर्प प्राइवेट लिमिटेड प्रॉपर्टी सोल्यूशन सर्विसेस प्रोवाइडर कंपनीचे संस्थापक तथा मॅनेजिंग डायरेक्टर श्री अक्षय बोराटे यांना अंत्यत प्रतिष्ठेचा समजला जाणारा भारत बिजनेस अवॉर्ड २०२४ देऊन सुपरस्टार बॉलीवूड अभिनेत्री श्रिया सरन यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
देशातील अग्रणी मार्केट रिसर्च कंपनी ‘रिसील इन’ च्या वतीने देशाच्या प्रगतीत योगदान देताना आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशपातळीवरील कर्तबगार तरुणांचा या संस्थेमार्फत दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
यावर्षी मुंबई येथील भारतरत्न गाणसम्राज्ञी लता मंगेशकर ऑडिटोरियम मध्ये ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री श्रिया सरन यांच्या शुभहस्ते आणि इर्पबिझ चे संस्थापक तथा सीइओ सिद्धार्थ दीक्षित यांच्या उपस्थितीत देशातील कर्तृत्ववान व्यक्तीना ‘भारत बिज़नेस अवॉर्ड २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले.
निर्मिक कॉर्प प्राइवेट लिमिटेड या कंपनीचे श्री अक्षय बोराटे संस्थापक तथा मॅनेजिंग डायरेक्टर असून ही कंपनी प्रॉपर्टी सोल्यूशन सर्विसेस प्रोवाइडर म्हणून कार्यरत आहे.या कंपनीच्या माध्यमातून प्रॉपर्टी सोल्युशन्स,प्रोजेक्ट डेव्हलपमेंट,इन्फ्रास्ट्रक्चर,जमीन डेव्हलपमेंट,प्रॉपर्टी सर्वे, इत्यादीमध्ये काम केले जाते.गावोगावच्या शेतकऱ्यांपासून MNC कंपनीपर्यंत ‘निर्मीक’ चे ग्राहक आहेत. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणारी कंपनी म्हणून निर्मीक ने मोठा नावलौकिक कमविला आहे.शेतकरी,बिल्डर डेव्हलपर्स,इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात भरीव काम केल्याने कंपनीकडे कामाचा मोठा ओघ सुरू आहे.सातारा पुणे आणि मुंबई शहरातुन कंपनी मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर काम करत आहे. “प्रॉपर्टी सोल्यूशन्स मोफत कंस्लटिंग सेवा” उपलब्ध करुन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.महसूल क्षेत्रात लोकांना भेडसावणाऱ्या अडचणीवर उपाय काढून त्यांच्या कोर्टाच्या फेऱ्या बंद करण्यासाठी कंपनी लवकरच सेवानिवृत्त अधिकारी,कायदेतज्ज्ञ,सिवील,अर्किटेकट इंजिनिअर इत्यादींना एकत्रित करून पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय सुरू करणार आहे.या सर्वच कामाची दखल घेऊन बोराटे यांना गौरविण्यात आले.
सुपरस्टार श्रिया सरन यांनी कंपनीने निर्मीक ची मुक्त कंठाने कौतुक केले.अक्षय बोराटे यांचे उद्योग क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती.घेतली.पारितोषिक विजेत्यांचे समर्पण आणि अपार कष्ट यांचे देखील तिने कौतुक केले.देशाला अशा कर्तृत्ववान लोकांची गरज आहे अशा लोकांची प्रेरणा घेऊन,आचरण केले तर देशाच्या प्रगतीला हातभार लागेल.
