अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना
भुईंज-( महेंद्रआबा जाधवराव )अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर याहीवर्षी मा.आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, (महाराजसाहेब) व मा. श्रीमंत छ.सौ. वेदांतिकाराजे भोसले, (वहिनीसाहेब) यांच्या शुभहस्ते, चेअरमन मा.श्री. यशवंत साळुंखे अध्यक्ष व मा. संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
अजिंक्यतारा साखर कारखाना कार्यस्थळावरील गणेशोत्सव मंडळाच्या या धार्मिक सोहळ्याप्रसंगी कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, मंडळाचे अध्यक्ष प्रविण जाधव,संचालक बजरंग जाधव तसेच संचालक मंडळ, गणेश मंडळाचे पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, (महाराजसाहेब) म्हणाले, गणपती ही बुद्धीची देवता आहे, प्रत्येक चांगल्या कार्यात गणपतीचे पूजन करून त्याची सुरुवात केली जाते, अज्ञान दूर करण्याचे काम गणपती देवता करते, प्रत्येक संकट दूर करण्यात स्वतःचे कार्य आणि अध्यात्मिक अधिष्ठानाबरोबरच ईश्वरीय शक्ती सदैव साथ देते यंदाचा गळीत हंगाम व कारखान्याचे इतर सर्व उपप्रकल्प यशस्वी होऊ दे, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व साखर कारखाना अधिकारी – कर्मचारी यांच्या जीवनात सुखसमृद्धी येऊ द्या अशी आराधना मा. आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, (महाराजसाहेब) व मा. श्रीमंत छ.सौ. वेदांतिकाराजे भोसले, (वहिनीसाहेब) यांनी श्री गणेशाच्या चरणी केली.
प्रारंभी कार्यकारी संचालक मा. श्री जिवाजी मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अजिंक्यमहर्षी स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांनी कारखाना स्थापनेपासून कार्यस्थळावर आध्यात्मिक, सांस्कृतिक यासह विविध शेतकरी हिताच्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिलेले असून ती परंपरा
मा. आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, (महाराजसाहेब) व मा. श्रीमंत छ.सौ. वेदांतिकाराजे भोसले, (वहिनीसाहेब)यांचे नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली कामगार बांधवांनी जपली आहे.
गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमास सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष भगवान पोवार खजिनदार तानाजी कदम सचिव पांडुरंग कुंभार आणि सर्व संचालक मंडळ, गणेशोत्सव मंडळ कार्यकारी समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांनी केले.