अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शेत शिवार » राज्यातील मागणीआधारित पिकांना भौगोलिक मानाकंन देण्यासाठी निधीची तरतूद करणार- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

राज्यातील मागणीआधारित पिकांना भौगोलिक मानाकंन देण्यासाठी निधीची तरतूद करणार- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

राज्यातील मागणीआधारित पिकांना भौगोलिक मानाकंन देण्यासाठी निधीची तरतूद करणार– कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई: श्रीवर्धन व परिसरातील रोठा सुपारीला (जीआय टॅग) भौगोलिक मानांकन देण्याबाबत तसेच राज्यातील मागणीआधारित पिकांना भौगोलिक मानाकंन देण्यासाठी निधीची तरतूद करण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

श्रीवर्धन व परिसरातील रोठा सुपारीला भौगोलिक मानांकन देण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, डॉ.बाळासाहेब सांवत कृषी विद्यात्रीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे उपस्थित होते.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यातील मागणी आधारित पिकांना भौगोलिक मानाकंन देण्यासाठी कृषी विभागाने गतीने कार्यवाही करावी. यासाठी नवीन लेखाशिर्ष तयार करावे. ज्या भागातील पीक आहे त्या भागातील शेतकऱ्यांना या मानांकनामुळे लाभ मिळणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘श्रीवर्धनी’ सुपारी कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आढळते. विशेषतः रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगर, मुरुड-जंजिरा, शेवटांडा आणि अलिबाग या भागांत सुमारे १०१.४८ हेक्टर क्षेत्रावर या सुपारीची लागवड करण्यात येते. या सुपारीची इतर जातींच्या तुलनेत वाढ जोमदार असून उत्पादनही अधिक मिळते. रायगड हा या सुपारीचा मूळ प्रदेश असल्याने तिच्या वैशिष्ट्यांचे संरक्षण आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळावा यासाठी जीआय टॅग मिळविण्याची प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. श्रीवर्धन ‘रोटा’ सुपारीला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket