कृषी विभागाकडील विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
सातारा – कृषी विभागामार्फत देण्यात येणा-या विविध कृषी पुरस्कार २०२५ साठी त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण सेंद्रिय शेती, वसंतराव नाईक शेती मित्र, उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी व कृषी विभागीतील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत.
शेतकरी,व्यक्ती,संस्था, गट यांनी विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करावेत. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकचे, सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.




