खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

खंडाळा-हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून खंडाळा तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ओढे, नाले व नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची तसेच पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचणे अथवा वाहून जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित नियंत्रण कक्ष अथवा पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे प्र. तहसीलदार खंडाळा श्री. रविराज जाधव, शिरवळ पोलिस निरीक्षक श्री. महेश इंगळे, खंडाळा पोलिस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप तसेच लोणंद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. शिवाजी जायपत्रे यांनी संयुक्तपणे आवाहन केले आहे.
तसेच वीर धरण व नीरा देवघर धरण येथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नागरिकांनी नीरा नदीपात्र, ओढे व नाल्यांमध्ये उतरू नये, नदीकाठच्या परिसरात अनावश्यक गर्दी करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक :
शिरवळ पोलिस स्टेशन – 02169-244133
खंडाळा पोलिस स्टेशन – 02169-252133
लोणंद पोलिस स्टेशन – 02169-225033
तहसील कार्यालय, खंडाळा (नियंत्रण कक्ष) – 02169-252128
आपत्कालीन सेवा – 112
शिरवळ रेस्क्यू टीम – 9890079216
प्रशासनाचे आवाहन :
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, पाण्याचा वेग असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन घटना आढळल्यास तात्काळ वरील क्रमांकांवर संपर्क साधावा.
“आपली सतर्कता, आपली सुरक्षा.”
“सतर्क राहा… सुरक्षित राहा… प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.”




