अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » शिरवळ परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर कारवाई; सातारा-पुणे जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार

शिरवळ परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर कारवाई; सातारा-पुणे जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार

सातारा जिल्हयातील शिरवळ, खंडाळा परिसरातील शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ०२ इसमांच्या टोळीला सातारा पोलीसांनी संपुर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्हा हद्दीतुन ०६ महीने कलावधीकरीता केले हद्दपार

सातारा -सातारा जिल्हयामधील शिरवळ परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे सराईत टोळीचा प्रमुख अजिंक्य उर्फ पप्पु अलबत कांबळे वय ३३ वर्षे रा. बौध्दवस्ती, शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा. तसेच टोळीचा सदस्य इम्रान कलाम काझी वय ३८ वर्ष रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा यांचे टोळीवर चोरी करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन विनयभंग करणे, रस्ता अडवुन शिवीगाळ दमदाटी करणे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन खंडणी मागुन शिवीगाळ दमदाटी करणे, महाराष्ट्र विरुपणास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन शिवीगाळ दमदाटी करणे यांसारखे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने फलटण शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री यशवंत नलवडे, पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हा हद्दीतुन ०६ महीने कलावधीकरीता हद्दपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री विशाल कृष्णा खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग सातारा यांनी केली होती.

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर अवैद्य मार्गाने दहशत व बळाचा वापर करुन चोरी करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन विनयभंग करणे, रस्ता अडवुन शिवीगाळ दमदाटी करणे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन खंडणी मागुन शिवीगाळ दमदाटी करणे, महाराष्ट्र विरुपणास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा करणे, तसेच बेकायदेशीर जमाव जमवुन शिवीगाळ दमदाटी करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनसुध्दा त्यांनी आपल्या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालुच ठेवल्या आहेत. त्यांच्या टोळीवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे शिरवळ, खंडाळा तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर कायदयाचा वचक राहवा याकरीता सर्वसामान्य जनतेतुन त्यांचेवर कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

मा.तुषार दोशी, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळीचा प्रमुख अजिंक्य उर्फ पप्पु अलबत कांबळे वय ३३ वर्षे रा. बौध्दवस्ती, शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा. तसेच टोळीचा सदस्य इम्रान कलाम काझी वय ३८ वर्ष रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा यांची सुनावणी होवुन सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हा हद्दीतुन ०६ महीने कलावधीकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.

सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता आगामी काळात सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.

या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket