Home » देश » अपघात की घातपात? अजित पवार विमान दुर्घटनेवर रोहित पवारांची स्फोटक माहिती,

अपघात की घातपात? अजित पवार विमान दुर्घटनेवर रोहित पवारांची स्फोटक माहिती,

अजित पवार यांचा अपघात नाही घातपात आमदार रोहित पवार यांनी उपस्थितीत केलेले प्रश्न

मुंबई : अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नव्हे तर घातपात झाला आहे, अशी आम्हाला दाट शंका वाटते. विमान अपघाताची चौकशी सीआयडीद्वारे न करता डीजीसीएसह परदेशातील अनुभवी संस्थांकडून करावी. विमान कंपनीला युरोपात हवाई वाहतूक करण्यास बंदी घातलेली असताना भारतात परवानगी कशी दिली गेली. वैमानिक व्यसनी होता का ? असे विविध प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी उपस्थितीत केले.

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याच्या घटनेला तेरा दिवस उलटल्यानंतर रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सविस्तरपणे आपल्या शंका, आक्षेप उपस्थित केले. सर्व घटनाक्रम आणि त्यातील त्रुटी निदर्शनास आणून त्यांनी हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा गंभीर आरोप केला.

अजित पवार यांचा विमान प्रवास ऐनवेळी ठरविण्यात आला. नियोजित वैमानिक न येता अन्य वैमानिकांनी विमान उडविले. पहिल्यांदा बारामती विमानतळावर दृशमानता चांगली होती, ती नंतर कमी कशी झाली. वैमानिक सुमित कपूर यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर कारवाई झाली होती, निलंबितही केले होते. तरीही व्हीएसआर कंपनीने त्यांना पुन्हा वैमानिक म्हणून का नेमले. त्यांची मानसिक स्थिती काय होती.

व्हीएसआर कंपनीचे लियरजेट ४५ हे विमान सोळा वर्षे जुने होते. इतके जुने विमान हवाई वाहतुकीसाठी योग्य होते का. मुंबईत २०२३ मध्ये याच कंपनीच्या एका विमानाचा अपघात झाला होता. त्या बाबतचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आला नाही. अपघातानंतर युरोपीय संघ विमान वाहतूक सुरक्षा एजन्सीने (ईएएसए) अपघाताचा अहवाल मागितला होता. तो अहवाल दिला नाही म्हणून ईएएसएकडून कंपनीला युरोपात हवाई वाहतूक करण्यास बंदी घातली होती.

व्हीएसआरचा परवाना निलंबित करण्यात आला होता. त्यानंतरही भारतात कंपनीला हवाई वाहतुकीची परवानगी कशी देण्यात आली. याच कंपनीकडून राज्यासह देशातील अनेक मुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांना विमाने पुरविली जातात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विमान कंपनीची चौकशी करावी. त्यांच्याकडील विमानाची दुरुस्तीचे काम कसे केले जाते. ते कोणाच्या मार्गदर्शनाखाली होते, याची चौकशी करण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले.

विमान अपघाताची चौकशी सीआयडी आणि डीजीसीएच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. आमचा या संस्थांवर विश्वास आहे. पण, सीआयडीला अशा प्रकारच्या घटनांची चौकशी करण्याचा अनुभव नाही. त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यांना विमानतळावर प्रवेश करण्याचाही अधिकार नाही. डीजीसीएसह फ्रान्सच्या नागरी विमान वाहतूक सुरक्षा तपासणी आणि विश्लेषण ब्युरो (बीईए) आणि ब्रिटनच्या विमान अपघात तपासणी शाखेकडून (एआयबी) चौकशी केली जावी.

अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे पूर्ण रेकॉर्डिंग कुटुंबातील किमान एका व्यक्तीला मिळाले पाहिजे. विमानाच्या कॉकपीटमधील संवाद पूर्णपणे उपलब्ध करून द्यावा. सध्या उपलब्ध असलेला संवाद सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक आणि बारामती एटीसीच्या अधिकाऱ्यांमधील आहे.

मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांचा सवांद समोर आला नाही. त्यामुळे त्यांची नेमकी स्थिती समोर यावी. विमान उतरविण्यासाठी बारामती विमानतळावरील २९ क्रमांकाची धावपट्टी सुरक्षित असतानाही ११ क्रमाकांच्या काहीशा धोकादायक धावपट्टीचा आग्रह का धरण्यात आला, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.

रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न

१६ वर्षे जुने विमान अद्याप हवाई वाहतूक सेवेत कसे होते.

विमान उड्डाण करण्याच्या स्थितीत होते का. त्याची तपासणी कुणी केली.

युरोपात बंदी असताना देशात वाहतुकीला परवानगी कशी दिली गेली.

 अपघाताग्रस्त विमानाची देखभाल – दुरुस्ती कुठे केली जात होती.

विमानात हवाई इंधन भरलेले कॅन होते का.

 विमानाची स्थिती सांगणारे ट्रान्सपॉन्डर बंद का होते.

 फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी उशिराने का आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अपघात की घातपात? अजित पवार विमान दुर्घटनेवर रोहित पवारांची स्फोटक माहिती,

अजित पवार यांचा अपघात नाही घातपात आमदार रोहित पवार यांनी उपस्थितीत केलेले प्रश्न मुंबई : अजित पवार यांच्या विमानाचा अपघात

Live Cricket