शैक्षणिक सोहळा: कांदाटीत विद्यार्थ्यांना मिळाले उज्ज्वल भविष्याचे मार्गदर्शन
कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने शनिवारी भव्य शैक्षणिक सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शनही देण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा घेतली.
महाबळेश्वर: शनिवार दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने श्री मल्लिकार्जुन विद्यालय वाघावळे – उचाट येथे भव्य शैक्षणीक सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात कंदाटबन, सालोशी, दोडानी, उचाट, वाघावळे, लामज, निवळी, आकल्पे, मोरणी-म्हाळुंगे, पु मोरणी, आरव, वलवन, शिंदी, चकदेव, पर्वत आदी शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन देण्यासाठी सन्मानीय श्री. रमेश हल्लोळी सर, समुपदेशक महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, सन्मानीय श्री. धमेंद्र शिंदे (म्हावशी) CEO Aim Institute आणि सन्मानीय कु. संकेत कदम (वाकी) पोलीस उपनिरीक्षक यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अभ्यास, करियर निवड आणि यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.
सदर उपक्रमाचे व्यवस्थापन कोयना धरणग्रस्त संघर्ष समिती व समस्त कांदाटीकर यांनी पार पाडले. या शैक्षणिक उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघाचे युवा नेतृत्व विराज शिंदे कोयना धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष सन्मानिय श्री एच. बी. जंगम साहेब, कांदाटीतील नेत्रुत्व सन्मानिय श्री. संजय मोरे साहेब, कांदाटी विकास संघाचे मा. अध्यक्ष श्री. मारुती दादा कदम साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
या शैक्षणिक सोहळ्याचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री. संदीप नलावडे ( वाळणे) यांनी केले. संस्थेने कांदाटी विभागात सामाजिक उपक्रम राबविल्याने कांदाटीकरानी समाधान व्यक्त केले.