अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात तोड फोड करणार? संपूर्ण महाराष्ट्रात बिचुकलेंची हवा.
सातारा -वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असणारे बिग बॉस फेम कलावंत , सातारचा आवाज आदरणीय डॉ. अभिजित बिचुकले बिग बॉस मराठी 5 व्या सीजनमध्ये पाहुणे म्हणून येणार असल्याने शोचा trp प्रचंड वाढला आहे.
बिग बॉस मराठी या रिएलिटी शोच्या माध्यमातून अभिजीत बिचुकले यांनी एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. कायम वादग्रस्त विधानांमुळेचते चर्चेत असतात. त्यांनी बिग बॉसच्या घरातही कल्ला केला होता. आपल्या हटके स्टाईलमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. घरातील सदस्यांशी देखील त्यांनी वाद घातला. होता त्यामुळे शोच्या टीआरपी मध्ये वाढ झाली होती.यावेळी अभिजीत बिचुकले यांची बिग बॉसच्या घरात पाहुणा म्हणून इंट्री होणार आहे. या पाहुण्यांची एन्ट्री झाल्याने ते घरातील कोणत्या सदस्यांशी पंगा घेणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात थोड फोड करणार असल्याचे त्यानीं जाहीर केल्याने प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात मनोरंजन पहावयास मिळणार आहे.