Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » नामदार मकरंदआबा पाटील यांचे उद्या जंगी स्वागत

नामदार मकरंदआबा पाटील यांचे उद्या जंगी स्वागत 

नामदार मकरंदआबा पाटील यांचे उद्या जंगी स्वागत 

वाई प्रतिनिधी -वीस वर्षानंतर वाईला लाल दिवा मिळाल्याने जननायक नामदार मकरंद आबा पाटील यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांच्या मध्ये जल्लोष असून मतदार संघामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.खंडाळा – वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे जननायक आमदार मकरंदआबा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याने मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्यानंतर प्रथमच दि. 25 रोजी जिल्ह्यात येत असुन कार्यकर्त्यांच्यावतीने ना. मकरंद पाटील यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शिंदेवाडी येथे सकाळी 9 वाजता आगमन होणार असुन त्या ठिकाणी प्रथम स्वागत करण्यात येणार आहे. तदनंतर स. 9.15 वा. शिरवळ, 9.50 वा. नायगांव, 10.30 वा. खंडाळा, 11.00 वा. वेळे, 11.30 वा. सुरूर, 11.45 वा. कवठे, दुपारी 12.05 वा. बोपेगांव, 12.30 वा. जोशीविहिर, 12.45 वा. भुईंज, 1.15 वा. पाचवड, 1.45 वा. उडतरे, 2.00 वा. विरमाडे, 2.15 वा. मर्ने फाटा, 2.30 वा. लिंब फाटा, 2.50 वा. सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट येथे, 3.50 वा. नागठाणे, सायं. 4.10 वा. काशिळ, 4.30 वा. उंब्रज, 5.00 वा. कराड शहरात आगमन तर सायं. 5.30 वा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर आगमन व अभिवादन करणार असल्याची माहिती दिलेली आहे.महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्या स्वागतासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket