वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सातारा जिल्ह्यात एकूण ६७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
वाई प्रतिनिधी -वाई फेस्टिवल २०२४ अंतर्गत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सातारा जिल्ह्यात एकूण ६७८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. गेले १६ वर्ष अविरत वाई फेस्टिवलच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र गेले दोन वर्ष हा उपक्रम केवळ वाई पुरता मर्यादित न ठेवता सातारा , पाचवड , पाचगणी , कराड व शिरवळ या ठिकाणी देखील या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. वाई मध्ये कशिविषेश्वर मंदिर गणपती घाट वाई येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरा २०० हून अधिक रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तदानासाठी महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता, रक्तदाना ची जनजागृती समाजात वाढत असल्याचे निदर्शनास आले. महागणपती घाटावर येणाऱ्या पर्यटकांनी देखील या ठिकाणी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उ्दघाटन वाईतील बाल रोगतज्ञ डॉ लक्ष्मण कदम यांनी केले. याप्रसंगी वाई फेस्टिव्हलचे नाव ऐकून खास या फेस्टिवल च्या सोहळ्याला भेट देण्यासाठी सोमवंशी सहस्त्रजून क्षत्रिय समाज, महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष श्री शंकरसा गुजराती , उपाध्यक्ष उदयसा जहागीरदार, सचिव श्री रमाकांत वाळवेकर, अरविंद कलबुर्गी, केशव क्षत्रिय, सुनीला क्षत्रिय आणि महाराष्ट्र प्रांतातून समाजाचे विविध कार्यकर्ते आले होते. पैकी उदयसा जहागीरदार यांनी स्वतः रक्तदान देखील केले.
पाचवड येथे पाचवड व्यापारी संघटना व तिरंगा एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, या शिबिराचे उद्घाटन मा. श्री अनिल क्षिरसागर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, वाई , पाचवड गावचे सरपंच श्री महेश गायकवाड, व्यापारी संघटना पाचवड अध्यक्ष श्री जीवन शेवाळे, तिरंगा एज्युकेशन सोसायटी सचिव श्री जयवंत पवार संस्थेचे हितचिंतक जेष्ठ सभासद श्री बाळकृष्ण डैडी वाघ यांनी केले. पांचगणी येथे ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले यांनी केले. या शिबिराचे उद्घाटन श्री अमोल बिरामणे, श्री अंकुश मालुसरे, श्री नामदेव चोपडे, श्री प्रसाद कारंजकर, श्री सुभाष मोरे, श्री यशवंत पार्टे, श्री आकाश बागडे तसेच कृष्णाई मंडळ भीमनगर पांचगणी यांचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सातारा येथे ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून या शिबिराचे उद्घाटन जयवंत (दादा) भोसले माजी उपनगराध्यक्ष सातारा नगर परिषद, चंदन घोडके भा.ज.पा. पदाधिकारी सातारा, पंकजशेठ ओतारी सुप्रसिद्ध व्यापारी , दादा गवळी अध्यक्ष जय जवान जय किसान गणेशोत्सव मंडळ सातारा यांच्या हस्ते करण्यात आले. कराड येथे ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले, या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पीएसआय रेखा देशपांडे मॅडम, पो. सविता मोहिते मॅडम, सोने चांदी व्यापारी विश्वास शिंदे, गणेश ओवे, भूषण थोरात व सुभाष शिंदे, सामाजिक कार्यकर्ते समीर जोशी, सुरेश पवार माजी सैनिक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिरवळ येथे भोईराज गणेश मंडळ, शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण २१६ रक्तदात्यांनी रक्तदान केले, याचे उद्घाटन मा. सभापती -गुरुदेव भाऊ बरदाडे, मा. सभापती -राजेंद्र आण्णा तांबे, सरपंच -रविराज मधुकर दुधगावकर, उपसरपंच.ताहेरभाई काझी ज्ञानसंवर्धनी शिक्षण संस्था संचालक -ईश्वर जोशी भोईराज गणेश मंडळ -मयूर कराळे /अमित कांबळे /अजय चौथे /सचिन पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचे रक्तदान बालाजी ब्लड बँक सातारा व माउली ब्लड बँक सातारा यांच्या सहकार्याने करण्यात आले. रक्तदान शिबिरास वाईकर नागरिक, पर्यटक व सातारा जिल्ह्यातील यांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल फेस्टिवल चे अध्यक्ष श्री शरद चव्हाण, कोषाध्यक्ष ॲड रमेश यादव, सचिव श्री सुनील शिंदे, निमंत्रक श्री अमर कोल्हापुरे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, फेस्टिवल चे समिती सदस्य डॉ मंगला अहिवळे, श्री मदन साळवेकर , श्री श्रीकांत शिंदे, श्री सलीमभाई बागवान, श्री संजय वाईकर, श्री सागर मुळे, श्री वैभव फुले, श्री भूषण तारू, श्री शैलेंद्र गोखले, श्री अमीर बागुल , श्री नितीन वाघचौडे, सौ प्रीती कोल्हापुरे, श्री तुकाराम जेधे, श्रीमती नीला कुलकर्णी, श्रीमती अलका घाडगे , श्री प्रशांत मांढरे , श्री प्रणव गुजर, श्री परवेज लाड, श्री निखील चव्हाण,श्री नितीन शिंदे उत्कर्ष पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार, शाखा व्यवस्थापक श्री मितेश मोरे, श्री प्रशांत सोनावणे, श्री साजिद मुल्ला, श्री अक्षय मराठे, श्री निरंजन गोळे, श्री राजेश जायगुडे, श्री हरिदास पवार, वसुली अधिकारी श्री आनंद पवार, श्री उदय घाडगे, श्री राजेश जगताप व इतर सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.