Home » राज्य » शेत शिवार » पाचगणीत रानभाजी महोत्सव २०२५ उत्साहात पार पडला

पाचगणीत रानभाजी महोत्सव २०२५ उत्साहात पार पडला

पाचगणीत रानभाजी महोत्सव २०२५ उत्साहात पार पडला

भारंगीपासून ‘किंगर’पर्यंत विविध औषधी भाज्यांचे प्रदर्शन; नागरिक व पर्यटकांचा उत्स्फूर्त सहभाग

महाबळेश्वर तालुका कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणी येथील शॉपिंग सेंटरमध्ये ‘रानभाजी महोत्सव २०२५’ उत्साहात संपन्न झाला. शहरी नागरिक आणि पर्यटकांना रानभाज्यांची ओळख करून देणे तसेच त्यातील औषधी गुणधर्मांची माहिती पोहोचवणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता.

महोत्सवात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक व औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या अनेक रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री केली. यामध्ये भारंगी, भालगा, कुरडी, मोहरी, चिचुरटी, चिवचिव, कोहेळ, करटोलो, आळू, तोंडली, वॉटर ग्रास आणि शेंडवल यांसारख्या विविध दुर्मिळ भाज्यांचा समावेश होता. प्रत्येक भाजीबरोबर तिचे आरोग्यविषयक फायदे सांगणारी माहितीपत्रके लावण्यात आली होती, ज्यामुळे पर्यटक व नागरिकांना भाज्यांचे महत्त्व समजणे सोपे झाले.

यावेळी एका स्थानिक शेतकऱ्याने ‘किंगर’ या विशेष रानभाजीची माहिती देताना सांगितले की ही भाजी पोटदुखीवर अत्यंत गुणकारी आहे आणि तिच्या वड्या बनवून सेवन केल्यास विशेष लाभ होतो. तसेच एका जाणकार व्यक्तीने सांगितले की ‘किंगर’ गुडघेदुखी व पोटाच्या विकारांवरही फायदेशीर ठरते. उपस्थितांनी या भाज्यांचा प्रत्यक्ष आस्वाद घेण्याबरोबरच त्यांचे पारंपरिक पाककृतींविषयी मार्गदर्शनही घेतले.

महोत्सवाला स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था तसेच देश-विदेशातील पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी stallsवरून भाज्यांची थेट खरेदी केली तर काहींनी ताज्या भाज्यांचा जागेवरच आस्वाद घेतला.

कृषी विभागाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, अशा उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होते आणि शहरी भागातील लोकांना रासायनिक मुक्त, नैसर्गिक व पौष्टिक आहाराचे महत्त्व समजते. यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळते.

‘रानभाजी महोत्सव २०२५’ मुळे पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, शहरी-ग्रामीण दरी कमी करण्यासही मदत झाली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन पाचगणी प्रतिनिधी-न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त इयत्ता पहिली

Live Cricket