गवडी शाळेला १० टॅबचे वाटप; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी गती
प्रतापगड प्रतिनिधी-गवडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची एक नवी सुरुवात झाली आहे. मुंबईतील दानशूर व्यक्तिमत्व श्री. अरुण शेठ आणि शाळा व्यवस्थापन समिती, गवडी यांच्या विशेष सहकार्यातून शाळेला १० टॅबलेट्स प्रदान करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळवण्याची संधी मिळाली आहे.
या टॅबलेट्सच्या मदतीने विद्यार्थी आता केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता डिजिटल माध्यमांचा वापर करून विविध गोष्टी शिकू शकतील. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, त्यांच्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये विविधता आणणे आणि डिजिटल युगात त्यांना तयार करणे हा आहे.
टॅबलेट वाटपाच्या या कार्यक्रमाला गावकरी, पालक, आणि शिक्षक यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमादरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अंकुश गणपत गोळे व सर्व सदस्य शिक्षक उपस्थित होते. यासाठी केंद्रप्रमुख सौ. गंगावणे मॅडम व श्री. बळवंत पाडळे साहेब ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रघुनाथ दळवी साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री. संजय धुमाळ साहेब यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.




