महाबळेश्वर पूर्व भागातील गावांच्या विकासासाठी १ कोटी २५ लाखांच्या कामांची निवेदने सादर
प्रतापगड प्रतिनिधी-महाबळेश्वर तालुक्यातील पूर्व भागातील पायाभूत आणि सामाजिक विकासाला गती देण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी गेनू भिलारे (गुरुजी) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे १ कोटी २५ लाखांच्या विविध विकासकामांची मागणी करणारी सविस्तर निवेदने सादर केली आहेत. या निवेदनांमध्ये रस्ते, शाळा, समाजमंदिर, स्मशानभूमी सुशोभीकरण आणि धार्मिक स्थळांच्या नूतनीकरणासह जनसुविधा उभारणीचा समावेश आहे.
सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये पुढील कामांचा समावेश आहे –
आंब्रळ (ता. महाबळेश्वर)
जननीदेवी मंदिर नूतनीकरण
स्मशानभूमी सुशोभीकरण
स्मशानभूमी रस्ता बांधकाम
तायघाट (ता. महाबळेश्वर)
शिवकालीन राजमार्ग हॉटेलाजवळचा स्मशानभूमी रस्ता
जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती
पांगरी (ता. महाबळेश्वर)
पांगरी ते भोसे रोड खडीकरण व डांबरीकरण
दांडेघर (ता. महाबळेश्वर)
जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधकाम
कासवंड (ता. महाबळेश्वर)
जिल्हा परिषद शाळा ते हिरवे वस्तीपर्यंत अंतर्गत रस्ता बांधकाम
हिरवे वस्ती येथे समाजमंदिर उभारणी
याशिवाय भोसे, गोडवली आणि खिंगर या गावांच्या विकासासाठीही संबंधित प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
ही निवेदने मंत्रालयातील सचिवांकडे देण्यात आली असून, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव रवींद्र काळे यांच्या सूचनेनुसार जिल्हा नियोजन कार्यालयातही नोंदणी करण्यात आली आहे.
संभाजी भिलारे यांनी सांगितले की, “या प्रस्तावित कामांमुळे महाबळेश्वर पूर्व भागातील ग्रामस्थांना दर्जेदार पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुधारणा, सामाजिक जीवनाची उन्नती तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळेल. त्यामुळे ही कामे तातडीने मंजूर करून जलदगतीने पूर्ण करण्यात यावीत,” अशी मागणी त्यांनी केली आहे.





