सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाची मंजू इन्स्टिट्यूट तर्फे अनोखी भेट!
सातारा -देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना अधिक आत्मबल मिळावे यासाठी साताऱ्यातील मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनी मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही राखी पाठवण्याचा उपक्रम पार पाडला.
यावर्षी सुमारे फॅशन डिझाइनिंग च्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयर विद्यार्थिनींनी स्वतःची कलात्मकतेचा वापर करून सुमारे 500 राख्या स्वतःच्या हाताने बनवल्या रक्षाबंधनाचे महत्त्व लक्षात घेऊन सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनींनी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या पाठवण्यात आल्या.राखी पौर्णिमा म्हटले की प्रत्येक भावाला बहिणीची आठवण येतेच पण अनेकांना कामामुळे बहिणीला भेटता येत नाही अशावेळी व्हिडिओ कॉल फोन मेसेज माध्यमातून राखी पौर्णिमा साजरी केली जाते मात्र सैनिकांना प्रत्येक वेळी बहिणीशी बोलणे शक्य होतच असं नाही हेच लक्षात घेऊन सैनिकांना राख्या पाठवून तुम्ही आमचे रक्षण करते बांधव असल्याचा प्रेमळ संदेश त्यांनी दिला. या राख्या तयार करताना मंजू इन्स्टिट्यूट फॅशन डिझाइनिंग च्या शिक्षिका जानवी कासार अश्विनी गायकवाड धनवी जोशी मॅडम यांनी मार्गदर्शन केले आणि प्राचार्य अनिल महादेव चव्हाण सर यांनी मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले या उपक्रमामुळे सैनिक आणि विद्यार्थिनींचे नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे.





