Home » ठळक बातम्या » आरोग्य » राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. शशिकांत शिंदे यांची जीवनप्रकाश मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलला सदिच्छा भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. शशिकांत शिंदे यांची जीवनप्रकाश मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलला सदिच्छा भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ. शशिकांत शिंदे यांची जीवनप्रकाश मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलला सदिच्छा भेट

पाचवड -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. शशिकांत शिंदे यांनी पाचवड ता. वाई येथील जीवनप्रकाश मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन वैद्यकीय व्यवसायात येणाऱ्या अडचणी संदर्भात डॉ मनोहर ससाणे यांच्याशी चर्चा केली. यावेळी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री किशोर बोराटे, डॉ अमोल भोसेकर, डॉ स्नेहा जमदाडे-कुदळे हे ही उपस्थित होते.

आ. शशिकांत शिंदे यांनी यावेळी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन आस्थेने त्यांची विचारपूस केली. त्यांचे कार्यकर्ते संजय शिर्के यांचे वडील गुलाबराव शिर्के हे ऍडमिट असून आयसीयू मध्ये उपचार घेत असल्याचे समजल्यावर त्यांचीही त्यांनी विचारपूस केली.यावेळी बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले की जीवनप्रकाश मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल हे पाचवड सारख्या प्रमुख बाजारपेठेच्या ठिकाणी असलेने वाई, जावळी, खंडाळा, कोरेगाव तसेच महाबळेश्वर या तालुक्यांतील रुग्णांच्या दृष्टीने सोयीस्कर आहे. डॉ मनोहर ससाणे हे जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व आहे. गेली ४३ वर्षे ते वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांनी हे हॉस्पिटल चालू करून वरील पाचही तालुक्यातील रुग्णांची मोठी सोय केली आहे. त्यामुळे रुग्णांना सातारला जाऊन उपचार घेण्यापेक्षा इथेच ग्रामीण भागात उपचार मिळत आहेत. 

हॉस्पिटलमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. डॉक्टर्स, नर्स आणि इतर स्टाफ अतिशय नम्रपणे आणि तत्परतेने सेवा देत आहेत. पुणे-बेंगलोर महामार्गावर हॉस्पिटल असलेने अपघातग्रस्त रुग्णांची इथे खूप चांगल्या पद्धतीने सोय होत आहे. अपघातग्रस्तांना इथे तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे. येथील स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये गणपती मंदिर असलेने येथील वातावरण हे सात्विक आणि सकारात्मक आहे.

डॉ मनोहर ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माझ्याकडून आवश्यक ते सहकार्य निश्चितपणे मी देईन. ग्रामीण भागात आई मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल चालवताना किती अडचणींना तोंड द्यावे लागते याची मला कल्पना आहे. डॉ मनोहर ससाणे यांना येत असलेल्या अडचणी संदर्भात त्यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात संदर्भात मी स्वतः शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करेन असे आश्वासनही आ. शशिकांत शिंदे यांनी डॉ मनोहर ससाणे यांना दिले.

यावेळी डॉ गणेश वाघोळे चंद्रकांत गवळी, अविनाश गोंधळी, लक्ष्मण गायकवाड, कोमल ससाणे, संजय शिर्के, विजय तरडे, समीर शेख, गणेश कवी, अविनाश गोंधळी, समीर डांगे, निवास बाबर, हृतिक आवळे, स्नेहल बरकडे, प्रियांका गायकवाड इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

रोहास संघटना डॉक्टरांच्या हक्कांसाठी कायम तत्पर राहील : डॉ मनोहर ससाणे

रोहास संघटना डॉक्टरांच्या हक्कांसाठी कायम तत्पर राहील : डॉ मनोहर ससाणे रुरल हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (रोहास), जिल्हा

Live Cricket