Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कारगिल विजय दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नी व वीरपित्यांचा सत्कार

कारगिल विजय दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नी व वीरपित्यांचा सत्कार

कारगिल विजय दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नी व वीरपित्यांचा सत्कार

कारगिल शूरवीरांचे बलिदान अविस्मरणीय – पालकमंत्री मा.ना. शंभूराज देसाई

सातारा : कारगिल युद्धातील शूर सैनिकांचे बलिदान हे देशासाठी अमूल्य आहे. त्यांच्या कर्तृत्वाची आणि त्यागाची आठवण समाजाने कायम स्मरणात ठेवली पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माजी सैनिक कल्याण मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री मा.ना. शंभूराज देसाई साहेब यांनी केले.

सैनिक स्कूल, सातारा येथे आयोजित कारगिल विजय दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुद्द पालकमंत्री मा.ना. शंभूराज देसाई साहेब होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सैनिक स्कूलचे प्राचार्य के. श्रीनिवासन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे, जिल्हा कोषागार अधिकारी आरती नांगरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल खाडे, निवृत्त कर्नल आर. जे. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मा.ना. शंभूराज देसाई साहेब, “कारगिल युद्धात भारतीय जवानांनी दाखवलेले शौर्य आणि त्याग संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. एक इंचही भूमी शत्रूला न गमवता त्यांनी मातृभूमीचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज सुरक्षित आहोत.”

ते पुढे म्हणाले, “माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध योजना सातारा जिल्ह्यात राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी उद्योगांकडून CSR फंड सामाजिक बांधिलकी म्हणून वापरण्यात येईल. जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्याचे कार्य सुरू आहे.”

कार्यक्रमात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. हंगे यांनी कारगिल युद्धातील अनुभव कथन करत वीर जवानांच्या शौर्याला मानवंदना दिली.

सन्मानाचा अत्युच्च क्षण

कार्यक्रमाच्या प्रारंभी कारगिल युध्दात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, तसेच दिव्यांग आणि शौर्य पुरस्कार प्राप्त जवानांचा पालकमंत्री मा.ना. शंभूराज देसाई साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, पालकमंत्री व्यासपीठावरून खाली उतरून प्रत्येक सन्मानार्थीकडे स्वतः जाऊन स्मृतीचिन्ह देत त्यांना आदराने नतमस्तक झाले, हे दृश्य उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारे होते.कार्यक्रमास माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीयांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

केट्स पॉईंटवर थरारक शोधमोहीम; ३५० फूट खोल दरीतून सापडला पाटणच्या (ढेबेवाडी) युवकाचा मृतदेह

केट्स पॉईंटवर थरारक शोधमोहीम; ३५० फूट खोल दरीतून सापडला पाटणच्या (ढेबेवाडी) युवकाचा मृतदेह महाबळेश्वर -सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर यांची धाडसी शोधमोहीम

Live Cricket