Home » राज्य » पर्यटन » भारतीय सैन्य दलाचा शौर्याचा सार्थ अभिमान- श्रीरंग काटेकर

भारतीय सैन्य दलाचा शौर्याचा सार्थ अभिमान- श्रीरंग काटेकर 

भारतीय सैन्य दलाचा शौर्याचा सार्थ अभिमान- श्रीरंग काटेकर 

कारगिल विजय दिवस गौरीशंकर, लिंब मध्ये उत्साहात साजरा.विद्यार्थ्यांचा सहभाग भारत मातेचा जयघोष.

लिंब- शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास घडवणाऱ्या भारतीय सैन्य दलाने कारगिलच्या भूमीवर शत्रू राष्ट्राला धूळ चारली असून भारतीय सैन्य दलाच्या या कामगिरीबद्दल सर्व भारतीयांना सार्थ अभिमान वाटतो. असे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले. ते लिंब ता. जि. सातारा येथील डॉ. पी. व्ही. सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूल, लिंब येथे २६ जुलै कारगिल विजय दिवस निमित्त आयोजित केलेल्या वीर जवान तुझे सलाम या कार्यक्रमांतर्गत बोलत होते. यावेळी स्कूलचे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी प्रमुख उपस्थित होते.

श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की, भारताच्या भूप्रदेशात पाकिस्तानी दहशतवादी व सैनिकांनी केलेली घुसखोरी परतवून लावताना भारतीय सैनिकांनी दाखवलेले धैर्य, साहस हे कौतुकास्पद आहे. कारगिलवर पुन्हा भारताचा तिरंगा ध्वज डौलाने फडकवून भारतीय सैनिकांनी पराक्रमाची शिकस्त केली. प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण म्हणाले की शूर जवानांच्या पराक्रमामुळे शत्रुराष्ट्राकडून आलेले संकट दूर करण्यात आले. शत्रुराष्ट्राच्या दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट भारतीय सैनिकांनी करून आपल्या लष्करी सामर्थ्याचे चुणूक दाखवली आहे.यावेळी विद्यार्थ्यांनी भारत मातेचा जयघोष करून परिसर दुमदुमून सोडला प्रास्ताविक व आभार अमित मडके यांनी केले.

कारगिल युद्धप्रसंगी भारतीय जवानांनी शत्रुराष्ट्राला नामोहरण करताना असंख्य भारतीय जवानांनी आपल्या प्राणाची बलिदान दिले आहे त्यांच्या या बलिदानामुळेच भारतातील प्रत्येक नागरिक आज सुरक्षित आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा पराक्रम भारतीय लष्कराने करून दाखवला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

केट्स पॉईंटवर थरारक शोधमोहीम; ३५० फूट खोल दरीतून सापडला पाटणच्या (ढेबेवाडी) युवकाचा मृतदेह

केट्स पॉईंटवर थरारक शोधमोहीम; ३५० फूट खोल दरीतून सापडला पाटणच्या (ढेबेवाडी) युवकाचा मृतदेह महाबळेश्वर -सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर यांची धाडसी शोधमोहीम

Live Cricket