कराड अर्बन ची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २० जुलै २०२५ रोजी -डॉ. सुभाष एरम
कराड :दि.कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२० जुलै २०२५ रोजी पंकज मल्टीपर्पज हॉल, कराड येथे आयोजित केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली.
कराड अर्बन बँकेस रिझर्व्ह बँकेकडून आणखीन पाच नवीन शाखा उघडण्याची परवानगी मिळाली असून आता सध्या एकूण ६७ शाखा कार्यरत आहेत नवीन पाच शाखांमुळे ७२ शाखा होणार आहेत. बँकेने मागील काळात ठेवलेली उद्दिष्टये ५८०० कोटी व्यवसायपूर्ती, शून्य टक्के एनपीए, मोबाईल बँकिंग सेवा, यूपीआय सेवा अशी सर्व उद्दिष्टये पूर्ण झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगत रविवार दि. २० जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. पंकज मल्टीपर्पज हॉल, हॉटेल पंकजचे मागे, कोल्हापूर नाक्याजवळ, कराड येथे आयोजलेल्या १०८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी सर्व सभासदांना केले आहे. सदरच्या सभेची नोटीस सर्व सभासदांना यापूर्वी त्यांच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेली आहे.
यावेळी माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, कराड अर्बन कुटुंब सल्लागार सीए. दिलीप गुरव प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी,सीए. धनंजय शिंगटे व संचालक उपस्थित होते.
