Home » राज्य » शिक्षण » मंत्री मकरंद पाटील यांचा महाबळेश्वर मोहरम कमिटीकडून सत्कार; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या आखाडे परिवाराचे कौतुक

मंत्री मकरंद पाटील यांचा महाबळेश्वर मोहरम कमिटीकडून सत्कार; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या आखाडे परिवाराचे कौतुक

मंत्री मकरंद पाटील यांचा महाबळेश्वर मोहरम कमिटीकडून सत्कार; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या आखाडे परिवाराचे कौतुक

महाबळेश्वर, दि. १४ जुलै: राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांचा महाबळेश्वर मोहरम कमिटीच्या वतीने त्यांच्या सातारा येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला. मोहरम कमिटीच्या माध्यमातून होत असलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोहरम कमिटीच्या युवा सदस्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ना. पाटील यांना फ्रेम आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला.

या प्रसंगी मोहरम कमिटीचे अध्यक्ष आसिफ भाई शेख, ज्येष्ठ समाजसेवक तौफिक भाई पटवेकर, भरत भोसले, मोहनराव कांबळे, अय्याज भाई खाटीक, ताजुद्दीन बागवान, सईद पटवेकर, झिशान शेख, मलिक शेख, यासीन शेख, साजिद सय्यद, जावेद खाटीक यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहरम कमिटीचे प्रमुख आणि ज्येष्ठ समाजसेवक तौफिक भाई पटवेकर यांनी ना. मकरंद पाटील यांना महाबळेश्वरमधील मोहरमच्या परंपरेची माहिती दिली. गेली अनेक दशके महाबळेश्वरमध्ये मोहरमच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी विशेषतः आसिफभाई शेख आणि भरत भोसले यांच्याकडे परंपरेने बसणाऱ्या पंजांचा उल्लेख केला. यंदा भरत भोसले यांच्या पंजासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने निर्माण झालेल्या अडचणीची माहिती त्यांनी दिली. अशा परिस्थितीत श्री गणेश मेडिकलचे नारायणराव लक्ष्मणराव आखाडे, गणेश आखाडे आणि राहुल आखाडे यांनी आपले दुकान बंद ठेवून दहा दिवस पंजा बसवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पटवेकर यांनी ना. पाटील यांना माहिती दिली.

ना. मकरंद पाटील यांनी आखाडे कुटुंबीयांच्या या कार्याचे विशेष कौतुक केले आणि त्यांचा सत्कार केला. त्यांनी हिंदू-मुस्लिम समाज बांधवांमधील ऐक्य असेच अबाधित राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, मोहरम कमिटीला भविष्यात लागेल ती सर्व मदत करण्याची ग्वाही ना. पाटील यांनी दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले “आजच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवपिढीच्या शिलेदारांचे हस्ते प्रज्वलित करण्यात आलेली ही

Live Cricket