Home » राज्य » शिक्षण » कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट

कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट

कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट

श्री मुधाईदेवी विद्‌यामंदिर देऊरच्या सन १९८६ च्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांचा गुरुजानाप्रती कृतज्ञता सोहळा व स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हसीना पटेल यांनी केले.

श्री मुधाईदेवी विद्‌यामंदिर देऊरच्या सन १९८६ चे दहावीचे विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा व स्नेहमेळावा कोमल अॅग्रो टूरीझम येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी गुरुजणांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सातारामधील प्रतिथयश उद्‌योजक व संस्थेचे विश्वस्त, माजी विदयार्थी इंजि.अरविंद कदम म्हणाले कि गुरू म्हणजे अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेऊन आपल्या विद‌या आपल्या विद्यार्थ्यांना मोठे करणारे ज्ञानपीठ होय. माणूस हा पैसा आणि प्रतिष्ठेने नव्हे तर आपल्या विचारांनी, आपल्या ज्ञानाने मोठा होत असतो आणि हे ज्ञानदान करून विद‌यार्थ्यांना मोठे करणारे आमचे सर्व गुरुजन होते. त्यांनी आम्हा सर्वाना कितीही संकटे आली तरी जिद्द आणि चिकाटीने अडचणींचा सामना करून संघर्षपूर्ण परिस्थितीतून मार्ग काढण्याची शिकवण दिली त्यामुळेच त्यांच्यामुळेच आम्ही घडलो असे सांगितले.

यावेळी बोलताना माजी मुख्याध्यापक श्री. विजयसिंह गायकवाड यांनी सांगितले कि सन १९८६ चे दहावीचे विद्यार्थी प्रामाणिक आणि अतिशय गरिबीतून वर आलेले असून त्यांनी कष्टाने, समर्पणवृत्तीने अभ्यास असून आज यशस्वी झालेले आहेत. यांच्या जिद्दीचा प्रवास समाजासाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे. 

यावेळी श्री मुधाईदेवी विदयामंदिर देऊरच्या सन १९८६ च्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांनी आपल्या गुरुजणांप्रती कृतज्ञता व्यक्त करून Lifetime Satisfaction Awardच्या स्वरूपात स्मृती चिन्ह, शाल-श्रीफल व बुके देऊन सर्व गुरुजणांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प व स्मृतीचिन्ह देऊन गुरुजणांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री डांगे सर, श्री.आर जी चव्हाण, श्री.अशोक यादव, श्री.आर बी सुतार, श्री.गावडे सर या शिक्षकांनी आप‌ली मनोगते व्यक्त केली तसेच माजी विदयार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना श्री. संजय राजे, हसीना पटेल महेश एरंडे यांनी आपल्या शालेय जीवनातील तसेच दहावीच्या आठवणीना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

या अविस्मरणीय कृतज्ञता सोहळा व स्नेहमेळावा कार्यक्रमाचे प्रायोजकत्व व आयोजन श्री.अरविंद कदम, श्री. जगन्नाथ देशमुख, श्री. शिवाजी लोखंडे, श्री. संजय कदम, श्री. संजय राजे, श्री.प्रसाद जंगम, हसीना पटेल यांनी केले होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. लक्ष्मण कदम यांनी केले. या कार्यक्रमास सन १९८६ च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले

Post Views: 19 बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले प्रतिनिधी -भाजपचे नेते बबनराव लोणीकरांवर

Live Cricket