Home » राज्य » शेत शिवार » पर्यटकांना साद घालणारा सडावाघापूरचा उलटा धबधबा

पर्यटकांना साद घालणारा सडावाघापूरचा उलटा धबधबा

पर्यटकांना साद घालणारा सडावाघापूरचा उलटा धबधबा

सातारा -तारळे पाटण रोडवर सुमारे 14 किमीवर असणाऱ्या सडावाघापूरला उलटा धबधबा आहे. दरवर्षी जुलै ऑगस्टमध्ये सडावाघापूर पठारावर असलेला हा धबधबा वाहू लागतो. परंतु यंदा जून महिन्यातच धबधबा वाहू लागला आहे.पठारावर संततधार पाऊस व जोरदार वारे असतात. यामुळे अनेक ठिकाणी पठारावरुन खाली वाहणारे पाणी वाऱ्यांच्या वेगामुळे उलट वाहते. त्यामुळे या ठिकाणी उलटा धबधब्याची परिस्थिती तयार होते. वाऱ्याचा दाब असल्यास अतिशय मनमोहक व डोळयाचे पारणे फेडणारा दृश्य या ठिकाणी दिसते.

यावर्षी मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला असल्याने सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सडावाघापूर येथील उलटा धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. सातारा जिल्हयातील पर्यटकांबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबईवरुनही पर्यटक निसर्गाचा अविष्कार पाहून मंत्रमुग्ध होत आहेत

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

एमपीएससीचा मोठा निर्णय ! अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ करणे बंधनकारक    

Post Views: 25 एमपीएससीचा मोठा निर्णय ! अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना ‘केवायसी’ करणे बंधनकारक     महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सोमवारी एक

Live Cricket