अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू; चालक फरार

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू; चालक फरार

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू; चालक फरार

पेठपार जवळील हृदयद्रावक घटना, अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल.

महाबळेश्वर, दि. ०९ जून:महाबळेश्वर तालुक्यातील पेठपार गावच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रविवारी (दि. ०८) रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास वाडाकुंभरोशी-पेठपार रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बापु लक्ष्मण जाधव (वय ७०) या वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर माणुसकीला काळिमा फासत चालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून, महाबळेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत बापु लक्ष्मण जाधव (वय ७०, व्यवसाय – केस कर्तनालय, रा. पारसोंड) हे रविवारी रात्री वाडाकुंभरोशी येथून आपल्या घरी पायी जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आणि हयगयीने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला आणि अंगावर गंभीर दुखापत झाली.

अपघातग्रस्त जाधवांना मदत करण्याऐवजी किंवा अपघाताची माहिती पोलिसांना देण्याऐवजी, वाहनचालकाने आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. उपचाराअभावी जाधवांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी मयताचे चिरंजीव शिवाजी बापु जाधव (वय ३५, हल्ली रा. नालासोपारा) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दिनांक ०९ जून रोजी सकाळी ११.४२ वाजता अज्ञात वाहनचालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१ (हयगयीने वाहन चालवणे), १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत होणे), १२५(अ)(ब) (अपघातानंतर माहिती न देता पळून जाणे) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि १३४(अ)(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हे घटनास्थळ पोलीस ठाण्यापासून पश्चिमेस सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. या अपघातामुळे पारसोंड आणि पेठपार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक काळे करत असून, अज्ञात वाहन आणि चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket