शेणोली ते रेठरे कारखाना रस्त्यावरील वृक्षतोड जोरदार सुरु जागतिक पर्यावरण दिन २०२५: महाबळेश्वरमध्ये प्लास्टिकमुक्ती आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचा बोलबाला बीबीए बीसीए साठी पुन्हा एकदा सीईटी.. यशोदा टेक्निकल कॅंपसमध्ये प्रवेश मार्गदर्शन कक्ष सुरू महाबळेश्वरमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विल्सन पॉईंट येथे स्वच्छता मोहीम; ७० किलोहून अधिक कचरा गोळा. आपला राजकीय उदरनिर्वाह काँग्रेस पक्षाचे जीवावर झाला आहे याचे भान विध्यमान भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी ठेवावे -रवींद्र साळुंखे -पाटील रुबी हॉल साताराची सर्वसामान्यांसाठी विशेष योजना सीटी स्कॅन तपासणी सवलतीच्या दरात, रविवारी विशेष सवलत
Home » देश » दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनीं 3 शब्दांतच विषय संपवला

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनीं 3 शब्दांतच विषय संपवला

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनीं 3 शब्दांतच विषय संपवला

पुणे -मागील काही दिवसांपासून जेष्ठ नेते शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याचं कारण म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे अनेकदा एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात शरद पवार यांचे खुलेपणाने कौतुक केल्याने महायुतीत पवारांना घेण्याचा संकेत मिळतोय का? अशी चर्चा देखील रंगली. मात्र, या चर्चांवर आज खुद्द शरद पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली असून, आपल्या नेहमीच्या थेट शैलीत त्यांनी अवघ्या तीन शब्दांतच हा विषय संपवला “मला माहिती नाही…”, असं म्हणत शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला पूर्ण विराम दिला आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket