महाराष्ट्रात पावसाचे संकट कायम, हवामान विभागाकडून ऑरेंज अन् यलो अलर्ट
राज्यात अवकाळी पाऊस सुरु असताना मान्सून यंदा वेळेपूर्वीच देशात दाखल होणार आहे. मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने सुरु झाली आहे. दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये पोहचणार आहे. त्याचवेळी राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने
राज्यात अवकाळी पाऊस सुरु असताना मान्सूनची वाटचाल केरळच्या दिशेने सुरु आहे. दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्राच्या दक्षिण भागासह, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भागात पोहचणार आहे. त्यामुळे मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे




