प्रज्ञावंत खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने राष्ट्राची मोठी हानी-श्रीरंग काटेकर.
डॉ. जयंत नारळीकर यांना गौरीशंकर मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली
लिंब- भारतीय विज्ञान क्षेत्रात विशेषता अवकाश संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना गौरीशंकर च्या लिंब कॅम्पसमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली प्रारंभी त्यांच्या प्रतिमेचे पूजन गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ पी व्ही सुखात्मे स्कूलचे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण नितीन शिवथरे डी फार्मसी चे प्राध्यापक रणजीत ठवरे व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
देशाच्या विज्ञान चळवळीमध्ये डॉ. जयंत नारळीकर मोठे योगदान राहिले आहे त्यांच्या निधनाने राष्ट्राची मोठी हानी झाल्याचे गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी मत व्यक्त केले. प्रास्ताविक व आभार प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण यांनी केले.
प्रज्ञावंत शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी केलेले कार्य हे चिरंतर राहणार असून विज्ञान चळवळ व्यापक करून राष्ट्राला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य डॉ. जयंत नारळीकर यांनी केले आहे अवकाश संशोधन क्षेत्रात गुढमय रहस्य उलगडण्यात त्यांना यश आले आहे ब्रह्मांडाचा शोध घेण्याचा त्यांचा ध्यास नवी पिढी पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे एक विद्यानिष्ठ ध्रुवतारा निखळल्याने राष्ट्राची मोठी हानी झाली आहे.




