Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » दुर्गम कांदाटीतून युवा नेतृत्वाला पंचायत समितीमधून उमेदवारी मिळावी यासाठी ग्रामस्थ आग्रही

दुर्गम कांदाटीतून युवा नेतृत्वाला पंचायत समितीमधून उमेदवारी मिळावी यासाठी ग्रामस्थ आग्रही

दुर्गम कांदाटीतून युवा नेतृत्वाला पंचायत समितीमधून उमेदवारी मिळावी यासाठी ग्रामस्थ आग्रही

सातारा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून अनेक जण आपल्या गणातून गटातून प्रयत्न करत आहेत. सातारा जिल्ह्यातील दुर्गम  कांदाटीमधील होतकरू युवा कार्यकर्ते श्री. शशीकांत भातोसे व श्री. प्रकाश कदम विकासात्मक कामांचा पाठपुरावा करीत असून, कांदाटी खोऱ्यात दर्जेदार लोकहिताची कामे व्हावीत म्हणून सातत्याने प्रयत्नशील आहेत. सण २०१६ पासून ते २०२५ पर्यंत त्यांनी महावितरण , BSNL टॉवर, शेतकऱ्यांच्या समस्या विषयक कामावर भर दिला असून सातत्याने अधिकारी वर्गकाकडे त्याचा पाठपुरावा चालू असतो.

भागात दळणवळण सुरळित व्हावे म्हणून हे कार्यकर्ते सातत्याने झटत असतात. कांदाटी खोऱ्यात आरोग्य सुविधा उत्तम मिळावी, व येतील गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून या कार्यकर्त्यांनी अनेकदा शालेय साहित्य वाटप, पूरग्रस्तांना मदत इत्यादी कार्यक्रम या भागात घेतले आहेत. तसेच आरोग्य सुविधा चांगली मिळावी म्हणून शासनाला पत्रव्यवहार देखील केला आहे. दोन्ही कार्यकर्त्यांची भागातील लोकांबद्दल असलेली तळमळ त्यांच्या कामकाजातून दिसते. म्हणून कांदाटी भागातून दोन्हीपैकी एका कार्यकर्त्यांची निवड पंचायत समितीसाठी करावी अशी परिसरातील ग्रामस्थ मागणी करताना दिसत आहेत.

निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कांदाटी परिसरातील प्रश्न  तरुणाईच्या पुढाकाराने सुटू शकतात असा ग्रामस्थांचा आत्मविश्वास आहे.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट

Post Views: 61 कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट श्री मुधाईदेवी विद्‌यामंदिर देऊरच्या सन १९८६ च्या दहावीच्या

Live Cricket