Home » राज्य » प्रशासकीय » अमित कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद : मोरेश्वर चावरे

अमित कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद : मोरेश्वर चावरे

अमित कुलकर्णी यांचे कार्य कौतुकास्पद : मोरेश्वर चावरे

अनंत इंग्लिश स्कूल शाळेचे व्यवस्थापन तसेच माजी विद्यार्थ्यांच्या वतीने, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबईचा व्यवस्थापन परिषदेवर निवड झाल्याबद्दल अमित कुलकर्णी यांचा सत्कार नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सातारा एज्युकेशन सोसायटीचे संचालक सुनील झंवर यांनी भूषवले. याप्रसंगी अनंत इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्रीमंत गायकवाड, माजी विद्यार्थी श्री. मोरेश्वर चावरे, श्री सुरेश शिंदे, श्री अप्पा औताडे, श्री प्रकाश भागवत, श्री बारटक्के, श्री दाभाडे, माजी विद्यार्थी, श्री. देवकर श्री. सुतार आदी अनंत इंग्लिश स्कूलचे शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पेहलगाम येथील हुतात्म्यांना श्रद्धांजली देऊन करण्यात आली.‘अमित कुलकर्णी यांनी अल्पावधीत साधलेली प्रगती सातारकरांसाठी अभिमानास्पद असून भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद सदैव पाठीशी असल्याचे मत श्री. मोरेश्वर चावरे यांनी व्यक्त केले.

शाळा माऊलीच्या वतीने झालेल्या सत्कारास उत्तर देताना श्री अमित कुलकर्णी म्हणाले की, ‘शालामाऊलीने केलेला सत्कार हा माझ्यासाठी संस्कार असून माझ्या पुढील वाटचालीसाठी सदैव ऊर्जाकेंद्र म्हणून कार्य करेल. यातून प्रेरणा घेऊन मी समाजसेवेसाठी कटिबद्ध राहीन. अनंत इंग्लिश स्कूलने आज पर्यंत समाजात अनेक चांगले, नामवंत विद्यार्थी दिले आहेत याचा मला अभिमान असून या परंपरेचा साजेसे काम करण्याचा मी सदैव प्रयत्न करीन.’

अध्यक्षीय मनोगतात श्री सुनील झंवर यांनी अमित कुलकर्णी यांच्यावर आपला सदैव अधिकार असून भविष्यात त्यांच्या प्रगतीत कायम पाठीशी असल्याचे सांगितले.समाजाच्या विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार देखील या कार्यक्रमाच्या प्रसंगी श्री सुनीलशेठ झंवर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी आनंद इंग्लिश स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मांढरदेव येथे शिवजयंती उत्सव शिवमय वातावरणात उत्साहात संपन्न

Post Views: 86 मांढरदेव येथे शिवजयंती उत्सव शिवमय वातावरणात उत्साहात संपन्न आज दि.२९ मांढरदेव येथे पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा

Live Cricket