काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या भगिनी भारती लाड यांचे निधन
काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांची ज्येष्ठ कन्या आणि माजी कृषीमंत्री विश्वजीत कदम यांच्या ज्येष्ठ भगिनी भारतीताई महेंद्र लाड यांचे आज (दि. २८) निधन झाले. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या निधनावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचे निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद व वेदनादायी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचे पाठबळ, प्रेम आणि स्नेह नेहमीच ऊर्जादायी राहिला. त्यांच्या निधनाने कदम व लाड परिवाराची कधीच न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आदरणीय ताईला भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शोकभावना विश्वजीत कदम यांनी एक्सवर पोस्ट करून व्यक्त केल्या आहेत.
माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद व वेदनादायी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचं पाठबळ, प्रेम आणि स्नेह नेहमीच ऊर्जादायी राहिले. त्यांच्या निधनाने कदम व लाड परिवाराची कधीच न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो
