लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार
मुंबई -मिळालेल्या माहितीनुसार, पाच टप्प्यांमध्ये ही अर्जांची छाननी केली जाणार आहे. यामध्ये लाखो बहिणींचे अर्ज अपात्र होण्याची शक्यता असल्यामुळे असंख्य लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजना विधानसभा निवडणुकीनंतर बंद होण्याच्या चर्चा राज्यात सुरू झाल्या होत्या.
पण सरकार ही योजना बंद करणार नाही, असे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकार या योजनेंतर्गत काही नवे नियम लागू केले. त्यामुळे योजनेचा लाभ घेणा-या हजारो महिला योजनेतून बाद करण्यात आल्या. राज्याच्या तिजोरीवर भार पडू नये म्हणून या नव्या अटी लागू करण्यात आल्याचेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले.
अशातच आता राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेत पुन्हा नव्या अटी लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच टप्प्यांमध्ये ही अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यात महिलांच्या कुटुंबांच्या उत्पन्नाची तपासण केली जाणार आहे. महिलांच्या कुटुंबांच्या उत्पन्नाची तपासणी झाल्यानंतर अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जातील.
