Home » राज्य » शेत शिवार » सह्याद्री साखर कारखाना निवडणूक निकाल माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पी डी पाटील पॅनेलचा सुमारे ८००० मताधिक्याने विजय.

सह्याद्री साखर कारखाना निवडणूक निकाल माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पी डी पाटील पॅनेलचा सुमारे ८००० मताधिक्याने विजय.

सह्याद्री साखर कारखाना निवडणूक निकाल माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पी डी पाटील पॅनेलचा सुमारे ८००० मताधिक्याने विजय.

कराड प्रतिनिधी -सह्याद्री कारखाना मतमोजणी दोन्ही फेरीचा निकाल आलेला आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी डी पाटील पॅनेलने ८००० मताधिक्याने निवडणूक जिंकली आहे. आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सरासरी ७५०० मते मिळाली तर बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलला सरासरी १५ हजार ५०० मते मिळाली आहेत. काँग्रेसचे निवास थोरात,भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम, भाजपा युवा मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनेलला सरासरी २२०० वी मते मिळाली आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात लक्ष लागून राहिलेल्या कराड उत्तरे तील सह्याद्री कारखान्याची लढत ही महत्वपूर्ण होती. आमदार मनोजदादा घोरपडे यांनी यावेळी एकाकी झुंज दिली. मुळातच तीन पॅनल मुळे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतील विजयामुळे माजी आमदार आणि मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तर येथील राजकारणाला बळकटी मिळाल्याची दिसून येते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 64 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket