मुनावळे येथील कोयना जलाशयाच्या कामात साताराच्या त्या कॉन्ट्रॅक्टरची मक्तेदारी.
सातारा -मुनावळे जलपर्यटन प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला असून या ठिकाणी होणाऱ्या अनेक प्रकल्पात सातारच्या ठेकेदाराने राजकीय वजन वापरून अनेक उद्योग केल्याचे दिसून येत आहे. या ठेकेदाराने अनेक ठिकाणी रस्त्याची निकृष्ट कामे केल्या असल्याचा आरोप अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या ठेकेदारास काळया यादीत टाकण्याची ही मागणी अनेकदा झाली आहे. प्रशासनाने या ठेकेदारास वेळीच रोखणे गरजेचे आहे. सदर ठेकेदारास सातारच्या ग्रामीण भागातील अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळत असतात.




