Home » ठळक बातम्या » खंडाळ्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा प्रारंभ

खंडाळ्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा प्रारंभ 

खंडाळ्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा प्रारंभ 

खंडाळा : खंडाळा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन किसनवीर सभागृहात करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील, वैद्यकिय अधिक्षक डॉ.संतोष गुरव व गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, केंद्रप्रमुख सुनिता साबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

       यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश पाटील म्हणाले, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची गरज सध्याच्या काळात आहे. पालकांमध्ये याबाबत जनजागृती करून लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शालेय स्तरावर मुलांची योग्य तपासणी व त्याद्वारे पुढील उपचार वेळेत झाल्यास त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. 

    यावेळी डॉ. संतोष गुरव यांनी या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. तर केंद्रप्रमुख सुनिता साबळे यांनी शिक्षण विभागाचा सहभाग व सहकार्याबद्दल आश्वस्त केले.

      यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुजा पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये अभियानाची माहिती व उपचार, संदर्भ सेवा व मोफत शस्त्रक्रिया यासंबंधी माहिती दिली.

       डॉ.निलेश जगदाळे व डॉ गणेश पोळ यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत देण्यात येणाऱ्या संदर्भ सेवांची सविस्तर माहिती दिली. सदर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे सुरेख नियोजन औषध निर्माण अधिकारी पवनकुमार थोरात, शीतल गोळे, आरोग्य सेविका मयुरी जमदाडे यांनी केले व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. वैद्यकिय अधिकारी डॉ. सीमा शिंदे यांनी आभार मानले.

      

       

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 270 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket