Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कराड उत्तर मधील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने- आमदार मनोजदादा घोरपडे

कराड उत्तर मधील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने- आमदार मनोजदादा घोरपडे

कराड उत्तर मधील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने- आमदार मनोजदादा घोरपडे

प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत मंत्रालय मुंबई येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत कराड उत्तर मतदार संघातील कोट्यवधीची अनेक सिंचनाची कामे मार्गी लावण्यात आल्याची माहिती आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले. यावेळी  सचिव संजय बेलसरे, कार्यकारी संचालक अतुल कपोले,  मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, मुख्य अभियंता हणमंत गुनाले, कार्यकारी अभियंता राहुल घनवट, कार्यकारी अभियंता रेड्डीयार उपस्थित होते.

बैठकीतील निर्णयाबाबत माहिती देताना मनोजदादा घोरपडे म्हणाले, कराड उत्तर मधील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची हणबरवाडी धनगरवाडी उपसा सिंचन योजनेपैकी धनगरवाडी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक ची सर्व कामे पूर्ण झाली असून सदरची योजना 20 मार्च अखेर कार्यान्वित होत आहे. तसेच धनगरवाडी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक व दोन बाबत कालबद्ध कार्यक्रम तयार असून टप्पा क्रमांक दोन ची स्थापत्य विद्युत व यांत्रिकीची सर्व कामे डिसेंबर 25 अखेर पूर्ण करून योजना कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

तसेच पाल-इंदोली उपसा सिंचन योजनेस या आठवड्यामध्ये मान्यता मिळणार आहे. गणेशवाडी उपसा सिचन योजनेचे टेंडर या आठवड्यात निघणार आहे., अतीत समर्थगाव काशीळ उपसा सिंचन योजना लवकर चालू करण्याचे नियोजन करण्यात आले.शामगांव व राजाचे कुर्ले गावास टेम्बू योजनेतून पाणी देण्याचे मान्य केले आहे. नागझरी गावास टेम्बू किंवा उरमोडी मधून पाणी आरक्षित करण्यासाठी नियोजन करण्यात आले.

दरम्यान पुनर्वसित गावठाण नागरी सुविधा पूर्ण करणेबाबतही बैठकीत निर्णय झाल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले.तसेच कृष्णा नदीवरील गावांना पूर संरक्षक भिंती बांधण्यात येणार असून यामध्ये कोर्टि, उंब्रज, वराडे, कोणेगाव, कवठे, खराडे, कालगाव, तारगाव, नांदगाव आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे. 

पुणे बेंगलोर महामार्गाच कोणेगाव गावच्या पूर्ण संरक्षण भिंतीस 56.19 व नांदगाव गावास पूर संरक्षण भिंतीसाठी 101.50 लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.तसेच कृष्णा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बॅरेज पद्धतीत नवीन बांधणे आणि त्या बंधाऱ्यावरील रस्ता 4.25 मीटरचा रुंद करणे यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले.

याशिवाय खोडशी धरणापासून चालू होणारा ब्रिटिशकालीन बंधारा सैदापूर ते गोवारे असा 5 किमी बंदिस्त पाईपलाईन प्रस्ताव पाठविला असून त्याचीही मंजुरीची कार्यवाही सुरू असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 23 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket