Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ओझर्डे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला दिन साजरा

ओझर्डे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला दिन साजरा

ओझर्डे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला दिन साजरा

वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पी एमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर्डे आणि निपुण भारत माता पालक गट यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक आठ मार्च रोजी महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषद शाळा ओझर्डे येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होते.

उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी महिलांनी आपले अनुभव कथन केले. त्याचप्रमाणे महिलांसाठी विविध स्पर्धां यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, हत्तीला शेपूट लावणे, संगीत खुर्ची ,यासारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये यशस्वी स्पर्धकांचं आणि सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले . या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रथम संस्थेच्या सातारा जिल्हा समन्वयक प्रभा लाड मॅडम उपस्थित होत्या. 

यावेळी बोलताना लाड मॅडम म्हणाल्या ओझर्डे येथील सर्व महिला या कर्तृत्वान असून त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असे आहे विविध कार्यक्रमातील त्यांचा सहभाग हा प्रशंसनीय असतो याच पद्धतीने महिला सदैव सक्षम राहिल्या पुढे आल्या त्याचबरोबर कर्तुत्ववान महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केलं तर गावाच्या नावलौकिकात निश्चित भर पडेल. याची मला खात्री आहे.

 शाळेचे मुख्याध्यापक दिलीप बाबर यांनी सर्वांचे स्वागत करून महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओझर्डे पी एम श्री शाळा येथील निपुण भारत महिला गट आणि पीएमश्री शाळा ओझर्डे येथील शिक्षक वृंद यांनी कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन केले होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 129 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket