रुरल हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, जिल्हा सातारा यांच्या क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
सातारा – रुरल हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित सालाबादप्रमाणे यंदाही रोहास क्रिकेट लीग 2025 या डॉक्टरांसाठीच्या क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडल्या. छत्रपती शाहू स्टेडियम येथे दिनांक 25, 26 व 27 फेब्रुवारी रोजी या स्पर्धांचे कृत्रिम प्रकाशझोतात आयोजन करण्यात आले होते.
असोसिएशनचे नूतन अध्यक्ष डॉ. मनोहर ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शंतनु पवार, डॉ. श्रीकांत कदम, डॉ. विश्वजित बाबर, डॉ. सचिन गुरव,डॉ. विकास फरांदे, डॉ. अविनाश शिंदे, डॉ. उदय सूर्यवंशी, डॉ. पंकज महाडिक आणि डॉ. अंबाजी देशमुख यांनी स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.
या स्पर्धेसाठी डॉ सुरेश शिंदे यांचा टीम सातारा हॉस्पिटल , डॉ.सोमनाथ साबळे यांचा प्रतिभा कॅपिटल्स , डॉ प्रवीणकुमार जरग यांचा जरग फायटर्स , डॉ आदित्य महाजन यांचा महाजन पलटण, डॉ निलेश कुचेकर यांचा कुचेकर किलर्स, डॉ गिरीश कदम आणि डॉ सैफ तांबोळी यांचा कदम तांबोळी टायटन्स, मंगलमूर्ती हॉस्पिटलचा मंगलमूर्ती इंडियन्स, आधार हॉस्पिटलचा आधार चॅम्पियन्स, सिटी हॉस्पिटलचा सिटी फ्लायर्स, गौरीशंकर डायग्नोस्टिकचा गौरीशंकर इलेवन असे 10 संघ सहभागी झाले होते .
या क्रिकेट टूर्नामेंटमध्ये गौरीशंकर इलेव्हनने प्रथम, मंगलमूर्ती इंडियन्सने द्वितीय, महाजन पलटणने तृतीय व आधार चॅम्पियन्सने चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस पटकावले. या स्पर्धांमध्ये साधारण 150 डॉक्टरांनी खेळत आनंद लुटला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ दिनांक 2 मार्च रोजी संपन्न झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज कर्पे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुलचंद्र खाडे, तसेच असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. युवराज कर्पे यांनी या स्पर्धा डॉक्टरांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले. सातारा जिल्ह्याच्या डॉक्टरांच्या क्रिकेटच्या इतिहासातील या पहिल्याच दिवसरात्र स्पर्धा असल्याचा उल्लेख त्यांनी केला. IMA अध्यक्ष डॉ. शरद जगताप यांनी भविष्यातही अशा स्पर्धा नियमितपणे व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
