Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » एकेज कॉमर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे सीए परीक्षेत देदीप्यमान यश

एकेज कॉमर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे सीए परीक्षेत देदीप्यमान यश

एकेज कॉमर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे सीए परीक्षेत देदीप्यमान यश  

सातारा : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या इंटरमीजिएट आणि फाउंडेशन परीक्षा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत साताऱ्यातील एकेज कॉमर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या या परीक्षेत एकेज अकॅडमीमधील सीए इंटरमीजिएट परीक्षेत यश इनामदार यांनी ६०० पैकी ४२९ गुण मिळवून साताऱ्यात प्रथम येण्याचा मान मिळविला, तर सीए फाउंडेशन परीक्षेमध्ये जुई गोखले हिने ४०० पैकी ३४७ गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला. एकेज अकॅडमीचा निकाल सर्वोत्तम असून, इंटरमीजिएट परीक्षेमध्ये ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. विशेष म्हणजे, कॉस्टिंग या विषयात १०० पैकी ९५ गुण मिळवून यश इनामदार याने भारतीय क्रमवारीत स्थान पटकावले आहे.

इंटरमीजिएट या परीक्षेत यश इनामदार, सलोनी धनावडे, मैत्रेय गोलिवडेकर, साद बागवान, अनिरुद्ध शहाणे, चिन्मय कुंदप, आर्या थरवल, वैष्णवी सकुंडे, वैष्णवी काटकर यांनी, तर सीए फाउंडेशन परीक्षेत जुई गोखले, श्रेया कवळेकर, अदिती इंगवले, इशिता लाहोटी, दर्शन माने, रिया माळी, हर्षवर्धन पंडीतराव, समद शेख, रितेश भोसले, आयेशा मुल्ला यांनी यश संपादन केले.

सीए परीक्षांचा अभ्यास करायचं म्हटलं की, मेट्रो शहरांमध्ये प्रवेश घ्यावा, ही सातारकरांची मानसिकता आता बदलली आहे. साताऱ्यातच सीए फाउंडेशन आणि इंटरमीजिएट परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी एकेज अकॅडमी सातारा सज्ज झाल्याने पुणे मुंबईकडे जाणाऱ्यांची संख्या मर्यादित झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकेज अकॅडमी सीएए फॅक्टरी म्हणून ओळखली जाते.

महानगराच्या तोडीचे शिक्षण साताऱ्यात मिळत असल्याने, हा बदल झाला आहे.त्याचबरोबर यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरु जाल्याची माहिती सीए आनंद कासट यांनी दिली.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन

न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आर्ट मेला’चे आयोजन पाचगणी प्रतिनिधी-न्यू एरा हायस्कूल, पाचगणी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त इयत्ता पहिली

Live Cricket