Home » राज्य » शिक्षण » कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात आपुलकीने होतो साहित्यिकाचा सन्मान-डॉ.शुभांगी कुंभार

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात आपुलकीने होतो साहित्यिकाचा सन्मान-डॉ.शुभांगी कुंभार

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात आपुलकीने होतो साहित्यिकाचा सन्मान-डॉ.शुभांगी कुंभार

सातारा – मराठी भाषा गौरव दिनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथे या विद्यापीठाचे कुलगुरु मा.डॉ .ज्ञानदेव म्हस्के यांचे शुभहस्ते सातारा जिल्ह्यातील साहित्यिक यांचा सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांचे मार्गदर्शनाने आणि मराठी विभाग प्रमुख यांच्या आस्थेने व कल्पक योजनेने मराठी विभागातून माणूस – माणूस जोडून ठेवण्याचे काम केले जात आहे. या उपक्रमामध्ये सातारा जिल्ह्यामधील ७० पेक्षा अधिक कवींनी याच्यामध्ये सहभाग घेतला मराठी भाषेमध्ये साहित्य निर्मिती करून समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या साहित्यिक यांचा आदर करणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.असे मत लेखिका व महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविणाऱ्या शिक्षिका डॉ.शुभांगी कुंभार यांनी व्यक्त केले. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेज मध्ये मराठी विभागात मराठी भाषेतून ग्रंथ लिहिल्याबद्दल डॉ.शुभांगी तानाजी कुंभार यांचा 

प्रा.डॉ. सुभाष वाघमारे, प्रभारी संचालक भाषा मंडळ यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.त्याबद्दल माहिती देत असताना त्या बोलत होत्या.प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउणे स्मृती दालन येथे त्यांनी डॉ. विद्या नावडकर यांचेकडे आपल्या शुभकुंभ या कविता संग्रहाच्या दोन प्रती मराठी विभागास भेट दिल्या.

छत्रपती शिवाजी कॉलेज मराठी विभाग व भाषा मंडळ यांनी या वर्षात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले,कवी संमेलन, वाचन ,सर्वांगीण विकास परिसंवाद,मराठी सर्जनशील लेखन कार्यशाळा, भारतीय भाषा उत्सव इत्यादी उपक्रम केल्यानं जनमानसात कार्यशील संस्कृती त्यानी उभी केली आहे,असे सांगत त्या पुढे म्हणाल्या की सातारा जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांनी या उपक्रमाचा निश्चितच लाभ घ्यावा आणि आपण लिहिलेलं साहित्य ग्रंथ छत्रपती शिवाजी कॉलेज मधील मराठी भाषा अभ्यास व संशोधन केंद्रास भेट द्यावेत . ज्या मुळे विद्यार्थी ,प्राध्यापक , अभ्यासक, जिज्ञासू साहित्यिक यांना हे ग्रंथ अभ्यास करण्यासाठी, साहित्य आनंद मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतील. पुढच्या काळात त्यावर विद्यार्थी प्राध्यापक परीक्षण देखील करू शकतील .भाषा मंडळ व मराठी विभागाने साहित्यिकांशी संवाद ठेवून प्रेम दिल्याबद्दल ,व सन्मान केल्याबद्दल त्यांनी विद्यापीठ भाषा मंडळ व कॉलेजचे ,मराठी विभागाचे आभार मानले.मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अत्यंत आगळावेगळा व कालानुरूप गरजेचा उपक्रम सुरू झाला,त्यास सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे,. जे साहित्यिक असतील त्यानी त्यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागास, आपल्या कलाकृतीसह भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. सन्मान प्रसंगी

मराठी विभागातील डॉ.विद्या नावडकर ,डॉ.आबासाहेब उमाप ,डॉ.संजयकुमार सरगडे ,प्रा.प्रियांका कुंभार ,प्रा. श्रीकांत भोकरे हे उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 99 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket