जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर्डे येथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्याख्यानांचे 5 मार्च रोजी आयोजन
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पीएमश्री स्कूल योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा ओझर्डे या ठिकाणी दिनांक पाच मार्च रोजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाच्या व्याख्यानांच्या आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी सकाळी 10 वाजता तंत्रस्नेही शिक्षक सन्माननीय बालाजी जाधव व डीआरडीओ भारत सरकारचे माजी समूह संचालक सन्माननीय काशिनाथ देवधर सर यांचे दुपारी 2.00 वाजता व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना संशोधन, विज्ञान, गणित आणि तंत्र शिक्षण याविषयीचे मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे. तरी याप्रसंगी ओझर्डे येथील शिक्षण प्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक दिलीप बाबर सर तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती ओझर्डे यांनी केले आहे.
