पानमळेवाडी येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
वर्षे दि. : रयत शिण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि लायन्स क्लब ऑफ सातारा अजिंक्य आणि अँको केअर ट्रस्ट,अँको लाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने पानमळेवाडी या गावी राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीराअंतर्गत पानमळेवाडी येथे बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महिलां व पुरूषांसाठी मोफत आरोग्य तपासणी, कर्करोग, बीपी व शुगर तसेच डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी वर्ये, पानमळेवाडी, रामनगर, नवनाथनगर, नेले, किडगांव परिसरातील सर्व लोकांनी या मोफत महाआरोग्य तपासणीसाठी या संधीचा लाभ घेण्यासाठी शिबिराला भेट द्यावी तसेच या शिबिरात जे संशयित रुग्ण भेटतील त्यांच्या पुढील चाचण्या अँको लाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रे येथे मोफत करण्यात येतील.तसेच डोळे तपासणी शिबिरामध्ये जे संशयित रुग्ण असतील त्यांची मोफत शस्त्रक्रिया व उपचार देसाई आय हॉस्पिटल हडपसर पुणे यांच्यामार्फत मोफत केले जातील तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.
असे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बापूबाहेब सावंत, लायन अरविंद शेवाळे व डॉ अर्जुन शिंदे, सरपंच विनोद शिंदे व प्रकल्प अधिकारी डॉ मोहन भोसले यांनी केलेले आहे.
