न्यू इंग्लिश स्कूल तळदेव व कनिष्ठ महाविद्यालय तळदेव, (तालुका महाबळेश्वर,) अशा दुर्गम भागातील, १९९६च्या कनिष्ठ महाविद्यालयीन सवगड्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
केळघर, ता:२५:एक दिवसाची शाळा शिकूया पुन्हा एकदा लहान होऊन शालेय जीवनाची अनुभुती घ्यावी.या दिवसाची आठवण सदैव प्रत्येकाच्या मनामनात येत असते. त्याचप्रमाणे आत्ताच्या सध्याच्या धगधगीच्या जीवनात आपापल्या क्षेत्रात कार्यरत असणारे शालेय जीवनातील सहकारी कुठेतरी आपण एकत्र येऊन उजाळा देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल तळदेव व कनिष्ठ महाविद्यालय तळदेव, (तालुका महाबळेश्वर,) अशा दुर्गम भागातील, १९९६च्या कनिष्ठ महाविद्यालयीन सवगड्यांचा स्नेह मेळावा नुकताच तापोळा येथे पार पडला अत्यंत नियोजनबद्ध व जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा स्नेहमेळावा ठेवण्यात आला होता.
शाळेत शिकत असताना
एकत्र बसून खालेले डबे, वस्तीग्रहा मध्ये काढलेले ते दिवस, निकालाच्या दिवसांची भीती, बोर्डाच्या परीक्षा, हातावर खालेल्या छड्या, मैदानात खेळलेले खो-खो कबड्डी लंगडी क्रिकेट चे क्षण, मन पीळवटून टाकणारा तो शेवटचा दिवस आणि आता उरलेले त्या गोड आठवणी , क्षण यांनाच उजाळा देण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध तयारी करून प्रथमतः या विद्यार्थ्यांनी ज्या कर्मभूमी त आपण शिकलो वाढलो अशा न्यू इंग्लिश स्कूल तळदेव व कनिष्ठ महाविद्यालय तळदेव या आपल्या शाळेला भेट देऊन आपल्या जुन्या आठवणींची उजळणी करून तसेच शाळेतील लहान मुलांना भेटून व आम्ही काय केले याची जाणीव करून त्यांना पुढील आयुष्यासाठी, शिक्षणासाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
हे सर्व विद्यार्थी २९ वर्षानंतर एकत्र आले.२९ वर्षांमध्ये घडलेल्या सर्व आठवणी दोनच दिवसात एकमेकांसमोर मांडून प्रत्येकाच्या मनातील मनोगत व भावना या सवंगड्यानी जाणून घेतल्या. कॉलेजची सुरुवात होत असताना २२ विद्यार्थ्यांचा एवढा कमी पटामध्ये कॉलेजची सुरुवात करून कॉलेजचे प्राचार्य एच. आर पवार व पर्यवेक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेतील शिक्षिका सौ कासुरर्डे , श्री.माने ,श्री.फरांदे , श्री. ढोले,श्री. कांबळे, श्री.करडे ,संगीता खरात ,एस. एस .जाधव या सर्व शिक्षकांचा आम्हाला घडवण्यात खूपच मोलाचा वाटा आहे .आज आमच्यातील माजी विद्यार्थी हे खरोखरच सर्व विद्यार्थी हे जणू काही सर्वच आदर्श विद्यार्थी म्हणून आज आपल्या महाराष्ट्र राज्यात आपल्या प्रचंड मेहनत व परिश्रम करून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून स्वतःचा व्यवसाय , तर कोणी मुंबई व पुणे या ठिकाणी पोलीस, शिक्षक , इंजिनीयर, या क्षेत्रात कार्यरत असून या शाळेची व कॉलेजचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात कोरीव करून ठेवले आहे. असे माजी विद्यार्थी रंजना जंगम यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाची संयोजक संतोष संकपाळ, शिवनेरी रिसॉर्टचे मालक ( तापोळा) व श्री संजय उतेकर ( उतेकर वानवली ) ऍग्रो टुरिझम चे मालक यांनी केले या स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थी
अंकुश मोरे,लक्ष्मण सकपाळ,संतोष जंगम ,रंजना जंगम,संतोष संकपाळ,संजय उतेकर,ज्ञानेश्वर जाधव,पांडुरंग शिंदे,प्रकाश जंगम,संपत ढेबे,हरिश जंगम,सखाराम मालुसरे ,पांडुरंग जंगम. या सर्व विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्यात उपस्थिती दाखवली.यावेळी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी देणगी देण्याचे आश्वासन दिले.
