पंढरपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेत सातारा जिल्ह्याला आठ पदके
प्रतिनिधी (राजगुरू कोचळे )पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे दिनांक 23 व 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य सब जुनिअर मैदानी स्पर्धेत सातारा जिल्हा ॲथलेटिक्स संघाने 4 सुवर्ण 2 रौप्य व 2 कांस्यपदकासह 8 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा 8,10,12 व 14 वर्षाखालील मुला मुलींच्या वयोगटासाठी झाली या स्पर्धेत दहा वर्षाखालील मुलांच्या गटात राजवीर कचरे याने 50 मीटर धावणे व 100 मीटर धावणे या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक मिळवले तर 14 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रावणी कांबळे हिने 80 मीटर धावणे व 300 मीटर धावणे या दोन्ही प्रकारात सुवर्ण पदक मिळवले, श्रीराज शिंदे याने 12 वर्षाखालील मुलांच्या गटात 60मीटर धावणे या प्रकारात रौप्य तर 300 मीटर धावणे या प्रकारात कांस्यपदक मिळवले, 10 वर्षाखालील मुलांच्या गटात वरद शेवाळे याने गोळा फेक या क्रीडा प्रकारात रौप्य पदक संपादन केले जान्हवी निकम हिने 14 वर्षाखाली मुलींच्या गटात 300 मीटर धावणे कांस्यपदक संपादन केले.
संघ व्यवस्थापक म्हणून कोंडीबा वीरकर सर यांनी काम पाहिले तर अंकित नवघणे यांनी या स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिले या स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व खेळाडूंचे त्यांच्या प्रशिक्षकांचे व पालकांचे जिल्हा संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन.
