हिंदवीत कार्निवल फन फेअर मोठ्या उत्साहात
सातारा, ता. १६ ः शाहूपुरी येथील श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीच्या हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये फ्रूट आणि व्हेजिटेबल मार्केट आणि कार्निवल फन फेअर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्निवल फन फेअरमध्ये इयत्ता नर्सरी ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्कूलच्या मैदानावर फ्रूट आणि व्हेजिटेबल यांची विक्री करत व्यवहारज्ञानाचे धडे घेतले, तसेच स्कूलच्या काही विद्यार्थ्यांनीही स्कूलमध्ये सुरू असलेल्या प्री-वोकेशनल कोर्स अंतर्गत त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या अभ्यासक्रमावर आधारित लस्सी, ताक तसेच फ्रूट सॅलड यांचे स्टॉल्स लावले होते. फन फेअरसाठी पालकांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता. पालकांनीही विविध प्रकारच्या वस्तू, खाद्यपदार्थ यांचे स्टॉल्स लावले होते. विद्यार्थी आणि पालक यांनी तिथे मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे साताऱ्यातील आनंदाश्रम येथील ज्येष्ठ व्यक्तींनी या फनफेअरला भेट देऊन चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला व त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी नानासाहेब कुलकर्णी, खजिनदार अश्विनी कुलकर्णी, पंचकोशाधारित गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका मंजूषा बारटक्के, उपमुख्याध्यापक शिल्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला भरभरून दाद दिली.
