संस्कृती मल्टीपर्पज हॉल बोरगाव येथे सेवानिवृत्ती सत्कार समारंभ युवा उद्योजक विक्रमनाना घोरपडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न
सातारा -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निनामचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री. रवींद्र बाबुराव साळुंखे गुरुजी यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. युवा उद्योजक विक्रमनाना घोरपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सुनीलतात्या काटकर (माजी शिक्षण व अर्थ सभापती), श्री.उदय शिंदे (राज्य नेते प्राथमिक शिक्षक समिती), डॉ.श्री.सोमनाथ साबळे (हृदयरोग तज्ज्ञ), श्री विश्वंभर रणनवरे (जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती), श्री.संतोष मांढरे (जिल्हा सरचिटणीस शिक्षक समिती), श्री.विठ्ठल माने (माजी चेअरमन प्राथमिक शिक्षक बँक) श्री. विशाल कणसे (संचालक प्राथमिक शिक्षक बँक), श्री.तानाजी कुंभार (संचालक प्राथमिक शिक्षक बँक यांची प्रमुख उपस्थिती होती.
