हिरालाल अवतार यांचे कडून अंध महिला रेखा भोसले यांना मदत-
कराड -श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसाचे निमित्त कराड येथील शिक्षण महर्षी परमपूज्य डॉ.बापुजी साळुंखे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हिरालाल बबन आतार यांनी वैयक्तिक स्वखर्चातून गरजू अंध महिला श्रीमती रेखा भोसले यांना उपजीविकेसाठी लागणारे व्यवसाय साधन सामुग्री व तिचा मुलगा धीरज भोसले याला शिक्षणासाठी शाळेत जाईला सायकल चे वाटप केले.
या कार्यक्रमास अँड.राम होगले, संत तुकाराम हायस्कूल चे मुख्याध्यापिका भालेकर मॅडम ,प्रक्टीसिंग स्कूल चे मुख्याध्यापक कोळी सर कराड तालुका शिक्षकेत्तर संघटना उपाध्यक्ष राहुल कोळेकर ,मेघनाथ नाईक हेमंत कदम, ज्ञानेश्वर कल्याणकर ,जयदीप काटकर ,महेश पाटील यांची उपस्थित होती




