गौरीशंकर फार्मसीची श्रेया गरङे हिचे नवसंशोधनात उत्तुंग कामगिरी
राष्ट्रीय स्तरावरील सी. आय. आय .ए या संशोधन प्रदर्शनासाठी निवड..
लिंब – मानवी शरीरात निर्माण विविध ज्वर ( ताप) या आजारावर नाविन्यपूर्ण संशोधनातून नवसंशोधन करणारी गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयातील एम फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थिनी श्रेया गरङे हिची राष्ट्रीय स्तरावर सी .आय. आय. ए. यांनी आयोजित केलेल्या नवसंशोधन प्रदर्शनासाठी तिच्या प्रबंधाची निवड करण्यात आली आहे ( क्रिएटिव्ह आयडियाज अँड इनोव्हेशन्स इन ॲक्शन मुंबई ( सी .आय .आय. ए )या संस्थेला संपूर्ण देशातून 766 संशोधनाची नोंद झाली होती यामध्ये श्रेया गरङे हिने फॉर्म्युलेशन अँड इव्हल्युएशन ऑफ हर्बल अँन्टिपायरेरिक टँबलेटस यावर शोधप्रबंध सादर केला होता यामध्ये गुळवेल या वनस्पतीचा वापर करून बनवलेल्या गोळ्यांची चाचणी प्राण्यावर केली असता या प्राण्यावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला परिणामी याची उपयुक्त लक्षात घेता या प्रबंधाची निवड सी.आय.आय.ए सेंटर मुंबई यानी केली आहे हे प्रदर्शन नेहरू सायन्स सेंटर वरळी मुंबई येथे पाच ते सात फेब्रुवारी रोजी होणार आहे तिच्या या शोधनिबधासाठी गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंबचे प्राचार्य डॉंं.योगेश गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.
संशोधन क्षेत्रातील उत्तुंग देशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिंलिद जगताप ,संचालक डॉं. अनिरुद्ध जगताप, जयवंतराव साळुंखे ,आप्पा राजगे ,प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर ,जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, कायदेशीर सल्लागार रवी जगताप यांनी अभिनंदन केले